Advertisement

चारकोपमधील 'या' ३ सिनेमागृहात बिनधास्त न्या घरचं खाणं-पिणं!

सिनेमागृहात पाण्याची बाटली, घरचे खाद्यपदार्थ नेण्यास मज्जाव करून महागडं पाणी आणि खाद्यपदार्थ विकत घेण्याची सक्ती करणारे सिनेमागृह मनसेच्या दणक्यानंतर नरमलेे आहेत. चारकोपमधील ३ सिनेमागृहांनी प्रेक्षकांना घरचं खाणं-पिणं आत नेण्यास परवानगी दिली आहे.

चारकोपमधील 'या' ३ सिनेमागृहात बिनधास्त न्या घरचं खाणं-पिणं!
SHARES

प्रेक्षकांना सिनेमागृहात बाहेरील खाद्यदार्थ आणण्यास मज्जाव करणाऱ्या मल्टिप्लेक्सविरोधात गेल्याच आठवड्यात उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतरही मल्टिप्लेक्स चालकांनी सिनेमागृहात पाण्याची बाटली आणि घरचे खाद्यपदार्थ नेण्यास मज्जाव केल्यावर मनसेने पुण्यातील सिनेमागृहात यावरून चांगलाच राडा केला. मनसेच्या या दणक्यानंतर नरमाईची भूमिका घेत चारकोपमधील ३ सिनेमागृहांनी प्रेक्षकांना घरचं खाणं-पिणं आत नेण्यास बिनशर्त परवानगी दिली आहे.


IMG-20180702-WA0019.jpg

सिनेमागृहात पाण्याची बाटली आणि घरचं खाद्यपदार्थ नेण्यास घातलेल्या बंदीबाबत वारंवार सिनेमागृह मालकांना सांगूनही ते ऐकत नसल्यानं पुण्यात मनसे कार्यकर्त्यांनी सिनेमागृहाच्या मालकांना मनसे स्टाईल दणका दिला. पुण्यानंतर कांदिवलीतल्या चारकोप परिसरातील मिलाप पीव्हीआर, रघुलीला आयनॉक्स आणि सिनेमॅक्स पीव्हीआर या तीन मल्टिप्लेकसला शनिवारी मनसे विभाग प्रमुख दिनेश साळवी यांनी यासंदर्भात एक पत्र पाठवलं.

या पत्राद्वारे प्रेक्षकांना पाण्याची बाटली आणि खाद्यपदार्थ सिनेमागृहात घेऊन जाण्यास मज्जाव करू नये, असा इशारा दिला होता. सोबतच सिनेमागृहातील पाणी आणि इतर खाद्यपदार्थांच्या अव्वाच्या सव्वा किंमती कमी करण्याचीही तंबी दिली होती.  


IMG-20180702-WA0026.jpg


मनसेचं हे पत्र हाती पडल्याबरोबर कांदिवलीतील ३ सिनेमागृहात खाद्यपदार्थ आणि पाणी घेऊन जाण्याची परवानगी प्रेक्षकांना देण्यात आल्याची माहिती साळवे यांनी दिली. तर सिनेमागृहातील खाद्यपदार्थ आणि पाण्याच्या बाटल्यांच्या किमतीबाबत व्यवस्थापकाशी चर्चा करून त्या ३ दिवसांत माहिती देऊ, असं आश्वासन सिनेमागृह व्यवस्थापकांनी दिल्याचंही साळवी यांनी सांगितलं.


IMG-20180702-WA0023.jpg

रविवारपासून कांदिवलीतील सिनेमागृहात खाद्यपदार्थ आणि पाण्याची बाटली नेता येत असल्यानं प्रेक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रेक्षकही यामुळे खूश असल्याचं चित्र सिनेमागृहात दिसत आहे. दरम्यान सिनेमागृहातील खाद्यपदार्थ आणि पाण्याच्या बाटल्यांची किमत तीन दिवसांत कमी झाल्या नाही तर मनसे पुन्हा रस्त्यावर उतरेल, असंही साळवी यांनी सांगितलं आहे.


हेही वाचा -

मल्टिप्लेक्समध्ये ५ रुपयांचं पॉपकॉर्न २५० रुपयांत का?, न्यायालयानं सरकारला झापलं

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा