Advertisement

...नाहीतर संपूर्ण पश्चिम द्रुतगती महामार्ग जाम करू : मनसे

मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांचे विरोधात मनसे आक्रमक झालीय.

...नाहीतर संपूर्ण पश्चिम द्रुतगती महामार्ग जाम करू : मनसे
SHARES

मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांचे विरोधात मनसे आक्रमक झालीय. मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर बोरिवली नॅशनल पार्क समोर असलेला उड्डाणपुलावर पडलेला खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात एका जोडप्याचा मृत्यू झाला होता.

मनसेचे सरचिटणीस नयन कदम यांनी मनसेच्या शिष्ट मंडळ घेऊन बोरिवली पूर्वेत कस्तुरबा मार्ग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. हायवेवर पडलेला खड्ड्यांचा संबंधित MSRDC चे अधिकारी आणि इंजिनियरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद व्हावा यासाठी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे.

तसंच मनसेकडून मुख्यमंत्रीकडे मागणी केली गेली आहे की, मुख्यमंत्र्यांनी रस्त्याच्या संबंधित अधिकारी आणि इंजिनियरकडून एक कोटी रुपये घेऊन या कुटुंबाला मदत भरपाई केली पाहिजे.

जर कस्तुरबा मार्ग पोलिसांनी दोन दिवसात हायवेवर पडलेला खड्ड्यांचा संबंधित अधिकारी आणि इंजिनिअरवर कारवाई नाही केली तर मनसे कडून संपूर्ण पश्चिम द्रुतगती महामार्ग जाम करून आंदोलन केला जाणार आहे, अशा इशारा नयन कदम यांना दिला आहे.

मुंबईच्या रस्त्या-रस्त्यावर, जागोजागी खड्डे पडलेले दिसत आहेत. तसंच पश्चिम द्रुतगती महामार्गावरही खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांनी अनेकांचे जीव घेतले आहेत. आताही दोघांचा या रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे दोघांना आपल्या जीवाला मुकावं लागलं. 



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा