'सेल्फी विथ खड्डा', मनसे कार्यकर्त्यांची नवी मोहीम

मुंबईतील खड्ड्यांची समस्या अद्यापही दूर झालेली नाही. त्यामुळं अंधेरीतल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी 'सेल्फी विथ खड्डा' मोहिम सूरू केली आहे.

SHARE

रस्त्यांवरील खड्डे ही मुंबईकरांसाठी काही नवीन समस्या नाही. अनेक मुंबईकरांचा या खड्ड्यांमुळं जीव गेला आहे, तर काही जण जखमी झाले आहेत. सतत सामोरं जावं लागणाऱ्या समस्येबाबत अनेकदा तक्रारी दाखल करत महापालिका आणि शिवसेना यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. मात्र, अजूनही मुंबईतील खड्ड्यांची समस्या दूर होत नाही आहे. त्यामुळं अंधेरीतल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी 'सेल्फी विथ खड्डा' मोहिम सूरू केली आहे. या मोहिमेर्तंगत जो व्यक्ती खड्ड्यांसोबत चांगला सेल्फी काढेल त्यांला रकमेच्या स्वरूपात पारितोषिक मिळणार आहे. 

सेल्फी विथ खड्डा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदेश देसाई यांनी 'सेल्फी विथ खड्डा' ही मोहिम सुरू केली असून, या मोहिमेला रहिवाशांचाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं संदेश देसाई यांनी म्हटलं. तसंच, मागील अनेक वर्ष महापालिकेवर शिवसेनेचा वर्चस्व आहे. मात्र, अद्यापही मुंबईकरांना चांगला रस्ता पाहायला मिळालेला नाही. खराब रस्त्यांमुळं अनेकदा दुर्घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये काही जणांचा जीव गेला असून काही जण गंभीर जखमी झाले आहेत, असंही संदेश देसाई यांनी म्हटलं.  

कोटी रुपये खर्च

आरटीआयमध्ये दिलेल्या माहितीनुसार, २०१३-१४ यामध्ये २ हजार २६८ खड्ड्यांच्या दुरूस्तीसाठी ४६,२५,९७,००० रुपये खर्च करण्यात आले असून, एका खड्ड्याच्या दुरूस्तीसाठी २,०३,९६६ रुपये खर्च करण्यात आले होते. दरम्यान, २०१३ ते २०१९ यामध्ये खड्डे दुरूस्ती करण्यासाठी महापालिकेला १७५.५० कोटी रुपये खर्च अपेक्षित होता.  हेही वाचा -

मुंबई-ठाण्यासाठी गुरुवारी रेड अलर्ट, मुसळधार पावसाचा इशारा

'हे' नवं पथक मध्य रेल्वेच्या ताफ्यात होणार दाखलसंबंधित विषय
ताज्या बातम्या