Advertisement

'संप मिटत नाही तोपर्यंत कोस्टल रोडचं काम बंद' : मनसे


'संप मिटत नाही तोपर्यंत कोस्टल रोडचं काम बंद' : मनसे
SHARES

बेस्टच्या संपावर तोडगा काढला नाही तर सोमवारी मुंबईत तमाशा करू असा इशारा बेस्ट प्रशासनाला दिल्यानंतर मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसेनं मुंबईतल्या वरळी इथं आंदोलन करत कोस्टल रोडचं काम बंद पाडलं आहे


मनसे आक्रमक पवित्रा

मनसेनं वरळीतील कोस्टल रोडचं काम बंद पाडलं आहे. तसंच या कोस्टल रोडच्या कामाला मनसेनं विरोध दर्शवला आहे. मनसे कार्यकर्त्यांनी काम करणारे कर्मचारी तसंच तिथल्या सर्व मशीनरी हलवण्यास भाग पाडलं आहे. त्याचप्रमाणं तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात आलेल्या कार्यालयांना टाळं ठोकलं आहे. संप मिटत नाही तोपर्यंत कोस्टल रोडचं काम सुरु करु देणार नाही, असा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.


मंत्रालयातील बैठक फोल

संपाचा सोमवारी सातवा दिवस आहे. संपावर तोडगा काढण्यासाठी मंत्रालयात बैठक बोलावण्यात आली होती. पण या बैठकीत देखील कुठलाच तोडगा निघाला नाही. त्यामुळे आता मनसे काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा