Advertisement

नोटाबंदीनंतर मुंबईत मोबाईल कंपन्या झाल्या लखपती!


नोटाबंदीनंतर मुंबईत मोबाईल कंपन्या झाल्या लखपती!
SHARES

मुंबई महापालिका ही पैशात खेळणारी महपालिका म्हणून ओळखली जाते. सुमारे 26 हजार कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या या महापालिकेत कोट्यवधी रुपयांचे व्यवहार केले जात असून नोटबंदीनंरतही केवळ मोबाईलवरून एसएमएस पाठवण्यासाठीही तब्बल साडे पंधरा लाख रुपये खर्च केल्याची माहिती हाती आली आहे. नोटबंदीनंतर पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांचा भरणा करण्यासाठी नागरिकांना एसएमएस पाठवण्यात आले होते. सुमारे दीड कोटी नागरिकांना मोबाईलवरून एसएमएस पाठवून त्यासाठी कंपनीला प्रत्येक एसएमएससाठी 85 पैसे मोजले गेले आहेत.

केंद्र सरकारने लागू केलेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा बंद करण्याचा निर्णय नोव्हेंबर 2016 मध्ये घेतला. या नोटबंदीनंतर राज्य सरकारच्या अर्थ विभागाने महापालिका आणि नगरपालिकांना विवध करांच्या भरणा तसेच थकबाकी भरण्यासाठी पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा भरण्याची परवानगी दिली होती. त्यामुळे महापालिकेच्या करनिर्धारण आणि संकलन खात्याच्या मालमत्ताधारकांना चलनातून बाद झालेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटांचा वापर करून मालमत्ता कराची थकीत भरण्याकरता येईल, असे एसएमएसद्वारे सर्व मालमत्ताधारकांना कळवले होते. त्यासाठी एम गेज इंडिया या कंपनीला एसएमएस पाठवण्याचे काम दिले. या कंपनीला प्रत्येक एसएमएससाठी 85 पैशांची बोली लावून काम मिळवल्यानंतर या कंपनीने 1 कोटी 59 लाख 98 हजार 786 एसएमएस पाठवल्याचे बिल पाठवल्यानंतर त्या कंपनीला 15 लाख 63 हजार 879 रुपये एवढ्या खर्चाचे पैसे अदा करण्यात आले आहे.


हेही वाचा

1100 कोटी खर्च करूनही ‘मिठी’चा नालाच!


पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारण्याचा कालावधी कमी असल्यामुळे निविदा न मागवता हे काम देण्यात आले. मुंबईत मोबाईल फोनधारकांची संख्या जास्त असल्यामुळे वेगवेगळ्या मोबाईल कंपन्यांना आवाहन करण्याऐवजी सर्व प्रक्रीया एकाच कंपनीद्वारे राबवणे सोयीचे व्हावे म्हणून बल्क एसएमएस पाठवण्याचे काम मेसर्स एम गेज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला देण्यात आले असल्याचे करनिर्धारण आणि संकलन विभागाचे प्रमुख अधिकारी संजोग कबरे यांनी म्हटले आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा