एअरपोर्टवर मॉकड्रीलचा थरार

अंधेरी - दहशतवादी हल्ले कसे रोखता येतील यासाठी मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस विमानतळावर गुरुवारी मॉकड्रील करण्यात आले. मुंबई पोलीस, आईएसएफ आणि डीजीसीए यांच्यावतीने हे मॉकड्रील करण्यात आले होते. अचानक बॉम्ब स्फोटाचा आवाज आल्याने आणि सर्वत्र धुर आणि आगीने काही काळासाठी लोकांच्या काळजाचा ठोका चुकला. काहींनी तर हा कोणतातरी दहशतवादी हल्ला असल्याचा समज केला. मात्र हा सर्व प्रकार जेव्हा लोकांच्या लक्षात आला तेव्हा लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला. मुंबई एअरपोर्टवर पहिल्यांदाच अशा प्रकारचे मॉकड्रील करण्यात आले होते. दहशतवादी हल्ल्याला कसं प्रत्युत्तर द्याव यासाठी हे मॉकर्डिल करण्यात आले.

Loading Comments