Advertisement

मुंबईत पुढचे काही दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस

जुलै महिन्यात विक्रमी पावसाने हजेरी लावली. आता हळूहळू पावसाचा जोर ओसरू लागला आहे.

मुंबईत पुढचे काही दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस
SHARES

राज्यात मागील काही दिवस मुसळधार पावसाने हजेरी लावली. अनेक भागांमध्ये पुरस्थिती निर्माण झाली. मात्र सध्या राज्यातील पाऊस ओसरण्यास सुरुवात झालेली आहे. राज्यात सध्या तरी पुढील 2-3 दिवस रेड किंवा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला नाही.

जुलै महिन्यात विक्रमी पावसाने हजेरी लावली. मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने शनिवार व रविवारच्या पावसापासून काहीसा दिलासा मिळाला होता. मुंबईत पुढील काही दिवस हलका पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

सोमवारी काही जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यात सोमवारी पावसाचा अंदाज असून यलो अलर्ट देण्यात आला आहे. यासोबतच रायगड आणि रत्नागिरीमध्येही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.

तर 2 ऑगस्टपासून राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार ओडिशा जवळील कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम बंगाल जवळ सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे ३ ते ९ ऑगस्ट या कालावधीत महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये पावासाचा जोर कमी असणार आहे.



हेही वाचा

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा