जयपूर-मुंबई पॅसेंजर ट्रेनमध्ये गोळीबार, RPF अधिकारी आणि 3 प्रवाशांचा मृत्यू

पश्चिम रेल्वेने यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे.

जयपूर-मुंबई पॅसेंजर ट्रेनमध्ये गोळीबार, RPF अधिकारी आणि 3 प्रवाशांचा मृत्यू
SHARES

महाराष्ट्रातील पालघरमधून मोठी बातमी येत आहे. जयपूर-मुंबई पॅसेंजर ट्रेनमध्ये झालेल्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला आहे. ही ट्रेन गुजरातहून मुंबईकडे येत होती. मृतांमध्ये आरपीएफच्या एएसआयसह ३ प्रवासी आहेत. आरपीएफच्या कॉन्स्टेबल चेतनने सगळ्यांना गोळ्या घातल्या आहेत.

गोळीबाराची ही घटना वापी ते बोरीवली-मीरा रोड स्थानकादरम्यान घडली. जीआरपी मुंबईच्या जवानांनी मीरा रोड बोरिवलीच्या दरम्यान कॉन्स्टेबलला अटक केली. आरोपीला बोरिवली पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे.

अचानक गोळीबार सुरू केला

जयपूर एक्सप्रेसच्या (ट्रेन क्रमांक १२९५६) कोच क्रमांक बी ५ मध्ये ही घटना घडली. ही घटना आज पहाटे 5.23 वाजता घडली. आरपीएफ जवान आणि एएसआय दोघेही ट्रेनमध्ये प्रवास करत होते. दरम्यान, कॉन्स्टेबल चेतनने एएसआयवर अचानक गोळीबार केल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली.

हवालदार मानसिक आजारी असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्यांची मानसिक स्थिती चांगली नव्हती तर त्याला ड्युटीवर का तैनात करण्यात आले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सोमवारी (31 जुलै) रोजी सकाळी 5.23 वाजता, ट्रेन क्रमांक 12956 जयपूर एस मध्ये बी5 मध्ये गोळीबार झाल्याची माहिती मिळाली. एस्कॉर्ट ड्युटीमध्ये सीटी चेतनने एस्कॉर्ट इनचार्ज एएसआय टिका राम यांच्यावर गोळीबार केला. 

ट्रेन बोरिवली रेल्वे स्थानकावर पोहोचली आहे (BVI) आणि माहितीनुसार, ASI व्यतिरिक्त 3 नागरीकांचा मृत्यू झाला आहे. या जवानाला पकडण्यात आले आहे. डीसीपी उत्तर जीआरपीला माहिती देण्यात आली आहे. सविस्तर अहवालाची प्रतीक्षा आहे.

पोलिस प्रवाशांचीही चौकशी करत आहेत

आरोपीचा हेतू काय होता आणि त्याने ही गोळी का चालवली हे समजू शकले नाही. सुदैवाने या गोळीबारात आणखी प्रवासी जखमी झाले नाहीत. चालत्या ट्रेनमध्ये गोळीबार होताच ट्रेनमध्ये एकच खळबळ उडाली. सध्या पोलीस रेल्वेतील प्रवाशांचे जबाबही नोंदवत आहेत. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

रेल्वेचा खुलासा

पश्चिम रेल्वेने यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, "पालघर स्टेशन ओलांडल्यानंतर आरपीएफ कॉन्स्टेबलने चालत्या जयपूर एक्सप्रेस ट्रेनमध्ये गोळीबार केला. त्याने RPF, ASI आणि इतर तीन प्रवाशांना गोळ्या घालून दहिसर स्टेशनजवळ ट्रेनमधून उडी मारली. आरोपी कॉन्स्टेबलला शस्त्रासह ताब्यात घेण्यात आले आहे."

*आरोपीला दुपारी 3 वाजता बोरीवली कोर्टात हजर करणार असून , आरोपीने  ARM गन मधून फायर केले असून , ARM गन जप्त करण्यात आली आहे.


हेही वाचा

बोरीवली ते विरार दरम्यान 2 नव्या रेल्वे लाईन

वांद्रे वरळी सी लिंकवर अचानक मर्सिडीज थांबली आणि मग पुढे...

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा