Advertisement

बोरीवली ते विरार दरम्यान 2 नव्या रेल्वे लाईन

लोकल प्रवाशांसाठी रेल्वेचे गिफ्ट, मुंबई उपनगर आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांदर्भात महत्वाची अपडेट

बोरीवली ते विरार दरम्यान 2 नव्या रेल्वे लाईन
SHARES

पश्चिम रेल्वेने बोरीवली ते विरार दरम्यान दोन नव्या रेल्वे लाईन टाकण्याच्या योजनेचा शुभारंभ केला आहे. एकूण 26 किलोमीटरचा हा मार्ग आहे.

सध्या, बोरिवली-विरार विभाग चार रेल्वे मार्गांवर चालवला जातो, जलद ट्रेन सेवेमुळे गर्दीच्या वेळेत यावर लक्षणीय परिणाम होतो.

एका ट्रॅकवर लांब पल्ल्याची गाडी जात असेल तर लोकल थांबून राहते. त्यामुळे प्रवाशांच्या पुढील नियोजनावर परिणाम होतो.

कमी रेल्वे लाईन असल्यामुळे प्रवाशांना या अडचणीचा सामना करावा लागतो. पण आता यासाठी वेगळी रेल्वे लाईन टाकण्यात येणार आहे. यामुळे रेल्वे प्रशासनाला प्रवाशांसाठी वेळेत गाड्या चालविता येणार आहेत.

पावसाळ्यानंतर बांधकामाला सुरुवात होणार आहे. यामध्ये वसई आणि भाईंदर खाडीकिनारी 50 इमारती हटवणे आणि खारफुटीची तोड करणे समाविष्ट असल्याची माहिती देण्यात आली आहे.

प्रत्यक्ष काम सुरू होण्यापूर्वी रेल्वेच्या पायाभूत सुविधा, कार्यालयीन इमारती आणि कर्मचाऱ्यांच्या निवासाची सुविधा पाडण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा