अंधेरी पश्चिम - अंधेरी पश्चिमेकडील जीवननगर, लिंक रोड स्टार बाजारासमोरचा मोगरा नाला कचऱ्याने तुडुंब भरलाय. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून आरोग्याचा गंभीर प्रश्नही निर्माण झालाय. स्थानिक रहिवासी सतीश पुजारी यांना विचारलं असता ते म्हणाले की, कचरा टाकण्यासाठी डब्यांची सुविधा नसल्यानं स्थानिक रहिवासी कचरा नाल्यात टाकतात. शिवसेना नगरसेविका ज्योती सुतार यांच्याकडे तक्रार करूनही लक्ष देत नसल्याचंही त्यांनी सांगितलं. तर नगरसेविका ज्योती सुतार यांना फोन केला असता प्रत्येकाच्या घरी डबा दिला असून दत्तक वस्ती योजनेंतर्गत काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. स्थानिक रहिवाशांनी लेखी तक्रार दिल्याशिवाय फार काही करू शकत नसल्याचंही त्या म्हणाल्या.