मोनोच्या पिलरवर रंगांच्या छटा

Mumbai
मोनोच्या पिलरवर रंगांच्या छटा
मोनोच्या पिलरवर रंगांच्या छटा
मोनोच्या पिलरवर रंगांच्या छटा
See all
मुंबई  -  

मुंबईतील मोनो रेलमुळे ठिकठिकाणी रस्ते खोदले गेल्यामुळे रस्त्यांचे विद्रुपीकरण झालेले असतानाच या रस्त्यांवर असलेल्या मोनो रेलच्या मार्गाच्या पिलरलाही पोस्टर चिकटवून त्याला अधिक विद्रुप केले जात आहे. त्यामुळे विद्रुप होणाऱ्या या पिलरवर रंगरंगोटी करून मोनो रेलच्या मार्गाचे एकाप्रकारे सौंदर्यीकरण करण्याचा संकल्प महापालिकेने केला आहे. त्यासाठी या पिलरवर कल्पकतेने रंगरंगोटी करून सामाजिक संदेश देणारे देत एकप्रकारे येथील सौंदर्यात भार टाकली जाणार आहे.

एफ / दक्षिण विभागात संत गाडगे महाराज ते चेंबूर अशाप्रकारे मोनोरेल मार्ग जात आहे. या मानोरेलच्या मार्गात एकूण 200 मोनोरेल पिलर आणि तीन स्थानके आहेत. या सर्व पिलरवर स्थानिक लोकांकडून विविध प्रकारचे पोस्टर्स, बॅनर्स लावून शहराचे विद्रुपीकरण करण्यात येत आहे. त्याला आळा घालण्यासाठी एफ / दक्षिण विभागातील मोनोरेलच्या पिलर्सवर सामाजिक जनजागृती करण्याच्या हेतूने पिलर कल्पकतेने रंगवण्याचा संकल्प करण्यात आला असल्याची माहिती एफ / उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी दिली आहे. त्यासाठी नायगाव स्प्रिंग मिलजवळ शुक्रवार 21 एप्रिल 2017 रोजी सकाळी ठीक 10 वाजता, स्थानिक नागरिकांनी या संकल्पात सामील होऊन आपल्या शहराचे सौंदर्य वाढवण्यास मदत करण्याचे आवाहन मोटे यांनी केले आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.