Advertisement

वायू वादळाचं संकट: चर्चगेट स्टेशनजवळ होर्डिंग कोसळून एकाचा मृत्यू

वायू चक्रीवादळाचा फटका आता मुंबईला बसू लागला आहे. मुंबईच्या चर्चेगट स्थानकात एका ६२ वर्षीय व्यक्तीचा होर्डिंग कोसळून मृत्यू झाला आहे.

वायू वादळाचं संकट: चर्चगेट स्टेशनजवळ होर्डिंग कोसळून एकाचा मृत्यू
SHARES

अरबी समुद्रातील वायू चक्रीवादळ मुंबईच्या किनारपट्टीपासून गुजरातच्या दिशेनं गेल्यानं या वादळाचा मुंबईला असलेला धोका टळला आहे. मात्र, या वायू चक्रीवादळामुळं मुंबईतील समुद्र किनाऱ्यावर सोसाट्याचा वारा वाहत असून जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. तसंच, या वायू चक्रीवादळाचा फटका मुंबईला बसू लागला आहे. मुंबईच्या चर्चेगेट स्थानकात एका ६२ वर्षीय व्यक्तीचा होर्डिंग कोसळून मृत्यू झाला आहे.

सिमेंटच्या शीटचं होर्डिंग

मधुकर आप्पा नार्वेकर (६२) असं या व्यक्तीचं नावं आहे. त्यांचा चर्चगेट स्थानक पूर्व इथं उभे होते. त्यावेळी त्यांच्यावर सिमेंटच्या शीट कोसळल्या. त्यामुळं मधुकर नार्वेकर गंभीर जखमी झाले. त्यांना त्वरीत जी.टी. रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.  

२ बोटी बुडल्या

या वायू चक्रीवादळामुळं माहिम समुद्रातील २ उभ्या बोटी बुडल्या. तर काही ठिकाणी जोरदार वारा सुटला असल्यामुळं झाडं कोसळली आहेत. एक झाडं दुचाकीवर कोसळ्यानं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं महापालिकेनं  मुंबईकरांना सावधानतेचा इसारा दिली आहे. तसंच, समुद्र किनाऱ्यांवर एनडीआरएफच्या टीम दाखल झाल्या आहेत.  त्याशिवाय या जोरदार वाऱ्यामुळं झाडं कोसळत असल्यानं महापालिकेनं मुंबईकरांना झाडी खाली उभं न राहण्याचा इशारा दिला आहे.

वाहतूक ठप्प

पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. बोर्डी रोड स्थानकाजवळ जोरदार वारा सुरू असल्यामुळं ५ पुलांचे गर्डर झुकले आहेत. त्यामुळं पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा होत आहे. दरम्यान, मान्सूनपूर्व पावसाळ्यातचं इतक्या अशा घटना घटत आहे तर, मुंबई मान्सून दाखल झाल्यानंतर काय होईल, यामुळं मुंबईकरांच्या मनात घबराटीचं वातावरण निर्माण झालं आहे.  



हेही वाचा -

तर, मोदी, मल्ल्या होतील सख्खे शेजारी!

'वायू' वादळाचं संकट: गुजरातला हायअलर्ट, मुंबईला सावधानतेचा इशारा



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा