'वायू' वादळाचं संकट: गुजरातला हायअलर्ट, मुंबईला सावधानतेचा इशारा

या वादळामुळं महाराष्ट्राच्या उत्तर समुद्रकिनारी सोसाट्याचा वारा वाहणार आहे. समुद्रकिनारी लोकांनी जाऊ नये अशी खबरदारी प्रशासनानं घेतली आहे. जोरदार वाऱ्यामुळं शहरातील अनेक भागात झाडे कोसळण्याच्या घटना घडण्याची शक्याता आहे.

SHARE

अरबी समुद्रातील वायू चक्रीवादळ मुंबईच्या किनारपट्टीपासून ६३० किमी दूर गेल्याने या वादळाचा मुंबईला असलेला धोका टळला आहे. मात्र वायू चक्रीवादळ येत्या १२ तासात गुजरातच्या किनारपट्टी भागात धडकण्याची शक्यता असल्याने गुजरातला हायअलर्ट देण्यात आला आहे. तसंच मुंबई आणि आसपासच्या परिसरात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता गृहीत धरून भारतीय हवामान विभागानं मुंबईकरांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

६३० किमी दूर 

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, गुरुवारी ठिकठाक पाऊस पडण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रातील वायू चक्रीवादळ मुंबईच्या किनारपट्टीपासून ६३० किमी दूर आहे. वायू चक्रीवादळ हे मुंबईच्या दक्षिण-पश्चिममध्ये ५४० किमी प्रती तास वेगानं पुढे जात आहे. 

सोसाट्याचा वारा वाहणार

या वादळामुळं महाराष्ट्राच्या उत्तर समुद्रकिनारी सोसाट्याचा वारा वाहणार आहे. समुद्रकिनारी लोकांनी जाऊ नये अशी खबरदारी प्रशासनानं घेतली आहे. जोरदार वाऱ्यामुळं शहरातील अनेक भागात झाडे कोसळण्याच्या घटना घडण्याची शक्याता आहे. त्यामुळं मुंबईकरांनी समुद्रकिनारी आणि झाडे असतील अशा परिसरापासून लांब राहण्याचा इशाराही मुंबई हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. 

समुद्राच्या पाण्यात वाढ

अरबी समुद्रातील वायू चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं जात असल्यानं मुंबईतील समुद्राच्या पाण्यात वाढ झाली आहे. त्यामुळं
 मच्छिमारांना बुधवारी आणि गुरुवारी खोल समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. गुजरातमध्ये हे वादळ धडकण्याची शक्यता असल्यानं प्रशासनानं तिथं हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.हेही वाचा -

बेस्टच्या ताफ्यात भाडेतत्त्वावर ४५० बस, कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य

नाल्यांनंतर आता सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास होणार कारवाईसंबंधित विषय
ताज्या बातम्या