Advertisement

कोरोनामुळं सुक्या मेव्याला अधिक मागणी

लाडू, चकली, करंज्या आणि शंकरपाळ्या करण्यात गृहिणी दंग झाल्या आहेत.

कोरोनामुळं सुक्या मेव्याला अधिक मागणी
SHARES

अवघा १ दिवस दिवाळीला शिल्लक राहिला असून, नागरिक दिवाळीच्या तयारीसाठी घाई करत आहे. लहानमुलं फटाके व नवीन कपडे घेण्यासाठी दुकानात गर्दी करत आहेत. विशेष म्हणजे कोरोनाचं सावट मुंबईवर असलं तरी घरोघरी फराळाची जय्यत तयारी सुरू आहे. लाडू, चकली, करंज्या आणि शंकरपाळ्या करण्यात गृहिणी दंग झाल्या आहेत.

दरवर्षी कंपनी, घरमालक आपल्या कर्मचाऱ्यांना व नातेवाईक एकमेकांना दिवाळीनिमित्त भेटवस्तू देतात. भेटवस्तूमध्ये शक्यतो मठाईला प्राधान्य अधिक जास्त असतं. परंतू, यंदा कोरोनाच्या सावटामुळं मिठाईस पर्याय म्हणून जास्त काळ टिकणारा आणि आरोग्यवर्धक अशा सुक्या मेव्याला ग्राहकांची विशेष पसंती दिसून येत आहे. सुका मेवा देण्याची पद्धत जुनी असली तरीही सध्या करोनाकाळात त्याला अधिक मागणी आहे.

यंदा काजू, बदाम, पिस्ता, मनुका, अक्रोड यांचे जगभरात उत्पादन चांगले झाले तरीही कोरोनामुळं विक्री मंदावल्यानं दरवर्षी वाढणाऱ्या सुक्या मेव्याचे दर ३० टक्क्यांनी घटले आहेत. दिवाळीनिमित्तानं मिठाई देण्याची परंपरा वर्षांनुवर्षे सुरू आहे. यंदा आरोग्यवर्धक सुका मेवा भेट म्हणून दिला जात आहेत. त्यामुळं यंदा सुक्या मेव्याच्या खरेदी जास्त असून ७० टक्के  व्यवसाय झाल्याची माहिती समोर येत आहे. दिवाळीत सुक्या मेव्यासोबतच चॉकलेटही भेटवस्तू दिली जाते. ‘बदाम, अक्रोड, काजू, हेजलनट या चॉकलेटना प्रचंड मागणी आहे.

सध्याचे दर

  • काजू - ८०० रुपये
  • बदाम - ७०० रुपये
  • मनुका - ४८० रुपये
  • अफगाणी मनुका - ६८० रुपये
  • अक्रोड - १६०० रुपये
  • पिस्ता - १००० रुपये
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा