Advertisement

मुंबईत नायट्रोजन डाय ऑक्साइडच्या प्रमाणात वाढ


मुंबईत नायट्रोजन डाय ऑक्साइडच्या प्रमाणात वाढ
SHARES

मुंबईत दिवसेंदिवस प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसंच, या प्रदूषणाचा मुंबईकरांना अनेक त्रासांना सामोरं जाव लागतं आहे. मुंबईत झाडांची संख्याही पुरेशी नसल्यामुळं प्रदूषण नियंत्रणही कठीण होत आहे. महापालिकेच्या पर्यावरण स्थितीदर्शक अहवालातील आकडेवारीनुसार, मुंबई शहरामध्ये नायट्रोजन डाय ऑक्साइडचे प्रमाण हे निर्धारित प्रमाणापेक्षा अधिक आहे.

प्रमाण अधिक

वाहनांच्या प्रदूषणामुळे नायट्रोजन डाय ऑक्साइड घातक ठरत आहे. कचऱ्यामुळं वातावरणातील अमोनियाचं प्रमाण जास्त असून, देवनार येथे सर्वाधिक आहे. मुंबई महापालिकेच्या अहवालानुसार वरळी, अंधेरी, भांडुप आणि देवनार या ४ ठिकाणी हवेच्या दर्जाची स्थिती तपासण्यात आली. यामध्ये प्रामुख्यानं नायट्रोजन डाय ऑक्साइज आणि अमोनिया यांचं प्रमाण अधिक नोंदवलं गेलं.

सर्वाधिक पातळी

सन २०१८-१९ नायट्रोजन डाय ऑक्साइडची सरासरी ५० ते ६० मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर नोंदवली गेली आहे. यामध्ये सर्वाधिक पातळी अंधेरी येथील केंद्रावर नोंदवली गेली. ही पातळी सर्वच ठिकाणी निर्धारित सुरक्षित मानकापेक्षा (४० मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर) अधिक असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

अमोनियाचं प्रमाण जास्त

नायट्रोजन डाय ऑक्साइड प्रामुख्याने वाहनांच्या प्रदूषणामुळे निर्माण होतो. देवनार भागातील अमोनियाचं प्रमाण मानकापेक्षा जास्त आहे. कचऱ्यामुळं मिथेन, अमोनियासारखे वायू निर्माण होतात. मिश्र कचऱ्यामुळं हे प्रदूषण होत असल्याची माहिती मिळते. ओला कचरा वेगळा ठेवणे यासाठी महत्त्वाचं असतं. सल्फर डाय ऑक्साइड, नायट्रोजन डाय ऑक्साइडसारखं वायूही निर्माण होतात.

वाहनांची देखरेख

नायट्रोज डाय ऑक्साइडसारख्या वायूंवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहनांमध्ये धूर वाहून नेण्यासाठी असलेल्या यंत्रणेमध्ये प्रदूषण नियंत्रक बसवण्यात येतात. मात्र, हे लहान ४ चाकी गाड्यांमध्येच असतात. ट्रक, बस किंवा टॅक्सीसारख्या गाड्यांमध्ये हे दिसत नाही. यासाठी वाहनांमधून होणाऱ्या प्रदूषणावर कठोर देखरेखीची गरज व्यक्त होत आहे.



हेही वाचा -

आरेतील कारशेडच्या निकालासाठी ४ सदस्यीय समिती

समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा