Advertisement

समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

समृद्धी महामार्ग आता 'शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग' म्हणून ओळखला जाईल.

समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
SHARES

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आलं आहे. हा महामार्ग आता 'शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग' म्हणून ओळखला जाईल. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. 

या महामार्गाला दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा प्रस्ताव भाजपकडून ठेवण्यात आला होता. भाजपा - शिवसेना सरकारच्या काळात समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याची मागणी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली होती.  त्यावेळी फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाच्या नावावरून वाद नको, याचे नाव आधीच निश्चित झाल्याचे सांगितले होते. त्यामुळे बाळासाहेबांचे नाव या द्रुतगती मार्गाला देण्यात येईल, याची शक्यता मावळली होती. मात्र, मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे आल्यानंतर समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आलं. 

५६ हजार कोटी रुपये खर्चून मुंबई आणि नागपूर या दोन शहरांमधील ७१० किलोमीटरचा प्रवास सहा तासांवर आणणाऱ्या ‘समृद्धी द्रुतगती महामार्गा’ची बांधणी तीन वर्षांत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.१२० मीटर रुंदीचा हा महामार्ग कोकण, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या पाच महसूल विभागांतील ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, वाशिम, अमरावती, वर्धा आणि नागपूर या १० जिल्ह्यांमधील २७ तालुक्यांच्या ३५० गावांमधून जाणार आहे.



हेही वाचा -

पक्षविरोधी काम करणाऱ्या नेत्यांवर कारवाई करणार, मुनगंटीवारांचं खडसेंना आश्वासन

मुंबई-पुणे हायपरलूप प्रकल्पही यार्डात? रिचर्ड ब्रॅन्सन घेणार मुख्यमंत्र्यांची भेट




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा