Advertisement

मुंबई-पुणे हायपरलूप प्रकल्पही यार्डात? रिचर्ड ब्रॅन्सन घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई-पुणे अंतर केवळ २३ मिनिटांत गाठण्याचा दावा करणाऱ्या ​हायपरलूप प्रकल्पाला​​​ देखील इतर प्रकल्पांप्रमाणेच स्थगिती मिळण्याची चिन्हे आहेत.

मुंबई-पुणे हायपरलूप प्रकल्पही यार्डात? रिचर्ड ब्रॅन्सन घेणार मुख्यमंत्र्यांची भेट
SHARES

मुंबई-पुणे अंतर केवळ २३ मिनिटांत गाठण्याचा दावा करणाऱ्या हायपरलूप प्रकल्पाला देखील इतर प्रकल्पांप्रमाणेच स्थगिती मिळण्याची चिन्हे आहेत. स्थगितीमुळे या प्रकल्पाच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये म्हणून हा प्रकल्प साकारणाऱ्या व्हर्जिन कंपनीचे प्रमुख रिचर्ड ब्रॅन्सन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं कळतं आहे. 

हेही वाचा- ४९६ किमी वेगाने धावणार हायपरलूप, मुंबई-पुणे प्रकल्प होणार २ टप्प्यांत पूर्ण

मुंबई (बीकेसी) ते पुणे (वाकड) दरम्यान ११७.५० किमीचा हा हायपरलूप प्रकल्प राबवण्यात येणार आहे. हे अंतर २३ मिनिटांत पार करण्यासाठी प्रति तास ४९६ किमी एवढी गती प्रस्तावित करण्यात आली आहे. मागील सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाने हायपरलूप प्रकल्पाला पायाभूत प्रकल्प म्हणून मान्यता दिली असून पुढील दोन ते अडीच वर्षाला कामाला सुरूवात करून ६ ते ८ वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दीष्ट्य समोर ठेवलं होतं.

या प्रकल्पाची जबाबदारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (पीएमआरडीए)च्या खांद्यावर टाकण्यात आली असून 'पीएमआरडीए'ने या प्रकल्पाचा पूर्व व्यहार्यता अभ्यास अहवाल तयार करून घेतला आहे. हा प्रकल्प व्यवहार्यता अभ्यास अहवाल मुंबई आयआयटीने तपासल्यावर ‘पीएमआरडीए’ने 'डेव्हलपमेंट परफाॅर्मन्स रिपोर्ट' (डीपीआर) तयार करण्याचं काम हाती घेतलं. ज्यात हा मार्ग नेमका किती किमीचा असेल, तो कसा आणि कुठून जाईल, त्यासाठी किती खर्च येईल, त्यासाठी किती वेळ लागले या सर्व बाबी अंतिम करण्यात आल्या.  

हेही वाचा- Exclusive: पुण्यावरून थेट बीकेसीत १४ मिनिटांत, हायपरलूपचं शेवटचं स्थानक बीकेसी?

परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागील सरकारच्या काळातील सर्व मोठ्या प्रकल्पांचा फेरविचार करण्याचं ठरवल्याने या प्रकल्पाच्या भवितव्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. सरकारने आधीच आरे कारशेडला स्थगिती दिली असून बुलेट ट्रेनचा फेरविचार सुरू केला आहे. तशीच गत हायपरलूप प्रकल्पाची होऊ नये म्हणून ब्रॅन्सन १२ डिसेंबरला मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना या प्रकल्पाचं महत्त्व पटवून सांगणार असल्याचं समजत आहे. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा