Advertisement

महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये येणार आणखी १६ निओनॅटल व्हेंटिलेटर्स


महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये येणार आणखी १६ निओनॅटल व्हेंटिलेटर्स
SHARES

नवजात बाल अतिदक्षता विभागासाठी लागणाऱ्या आणखी १६ निओनॅटल व्हेंटिलेटर्सची खरेदी महापालिकेच्या वतीनं केली जात आहे. केईएम, शीव आणि नायर या प्रमुख रुग्णालयांसह हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. आर. एन.कूपर रुग्णालयांसाठी या १६ निओनॅटल व्हेंटिलेटर्सची खरेदी केली जात आहे.


बालमृत्यू रोखण्यासाठी अावश्यक

मुंबईत जन्मणाऱ्या प्रत्येक दहा बालकांपैकी दोन बालकांना नवजात बालक अतिदक्षता विभागात ठेवावं लागतं. मात्र या बालकांवरील उपचाराचा प्रश्न गंभीर असताना पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांसह उपनगरीय रुग्णालय व प्रसूतिगृहांमध्ये हे विभाग वाढवले जात नाहीत. मात्र, ‘एनआयसीयू’अभावी नवजात बालकांच्या मृत्यूचं प्रमाण वाढू लागल्यानं सन २०१३मध्ये महापालिका प्रशासनानं विविध रुग्णालयांसाठी २५ निओनॅटल व्हेंटिलेटर्सची खरेदी केली होती. त्यानंतर महापालिकेच्या विविध रुग्णालयांसाठी निओनॅटल व्हेंटिलेटर्संची खरेदी केली जात आहे.


अडीच कोटींचा खर्च

निओनॅटल व्हेंटिलेटर्स या यंत्राचा वापर नवजात बालकांना निओनॅटल अति दक्षता विभागात कृत्रिम श्वसन करण्यासाठी केला जातो. या निओनॅटल व्हेंटिलेटर्संची खरेदी अर्जेंटिनातील टेकमे एस. ए. या कंपनीकडून केली जात आहे. ३ वर्ष हमी कालावधी आणि पाच वर्ष देखभाल यानुसार यासाठी सुमारे अडीच कोटी रुपये खर्च येणार अाहे.


या रुग्णालयांना मिळणार व्हेंटिलेटर्स
केईएम रुग्णालय
शीव रुग्णालय
नायर रुग्णालय
हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय
डॉ. आर.एन. कुपर रुग्णालय

हेही वाचा -

मुंबईकरांनो, घरापासून मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचा सायकलनं!

मोबाइल खिशात फुटला, भांडुपमधील घटना

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा