Advertisement

५५ हजारांहून अधिक लहान मुलांना कोरोनाची लागण


५५ हजारांहून अधिक लहान मुलांना कोरोनाची लागण
SHARES

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून, राज्यातील पालकांची चिंता वाढणारी बाब समोर आली आहे. कोरोनाच्या रडावर लहान मुले असून मार्च महिन्यांत ५५ हजारांहून अधिक मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. १० वर्षांपर्यंतच्या १५ हजार ५०० तर १० ते २० वयोगटातील ४० हजार मुलं कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहेत.

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण जास्त आहे. जानेवारीत १० वर्षांच्या खालील मुलांना कोरोनाचा होणाऱ्या मुलांचे प्रमाणे २००० हजार होते. फेब्रुवारीत २७०० होते. मात्र मार्च महिन्यात थेट १५ हजारांचा टप्पा गाठला आहे.

१० ते २० वयोगटातील मुलांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण ५,३०० होते. फेब्रुवारीमध्ये ८,००० झाले. त्यानंतर मार्चमध्ये ४०,००० टप्पा पार केला. दरम्यान अजूनही शाळा बंद आहे, ऑफलाईन सर्व काही सुरू आहे. तरी देखील मुलांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण अधिक आहे. पण आता परीक्षाचा काळ असल्यामुळे पालकांसमोर मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.



हेही वाचा -

शीतल-अभिजीतचं लव्ह साँग 'लंडनचा राजा...'

या' दिवशी अॅमेझॉनवर वेल डन बेबीचा खास प्रीमिअर

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा