Advertisement

मेट्रो 3 : आणखी 35 झाडांचा बळी?


मेट्रो 3 : आणखी 35 झाडांचा बळी?
SHARES

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो 3 मार्गाच्या कामासाठी झाडांची बेसुमार कत्तल सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत आतापर्यंत 5000 झाडांची कत्तल करण्यात आली असून त्यात आणखी 35 झाडांचा बळी जाण्याची शक्यता आहे.


जमीन खोदतानाच झाडे कापण्याचा घाट

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने मेट्रो 3 च्या कामाअंतर्गत दोन मेट्रो स्थानकाच्या कामासाठी माहीममध्ये जमीन खोदण्याचे यंत्र लावले आहे. त्याअंतर्गत 35 झाडे कापण्याचा घाटही मेट्रो रेल कॉर्पोरेशनने घातला आहे. गुरुवारी वृक्ष प्राधिकरणाच्या सुनावणीदरम्यान ही बाब समोर आल्याने 'सेव्ह ट्री' यावर आक्षेप घेत वृक्ष प्राधिकरणाकडे हरकत नोंदवल्याची माहिती 'सेव्ह ट्री'चे झोरू बाथेना यांनी दिली.



हे वाचा - मेट्रो 3 : झाडांची कत्तल रोखण्यासाठी शेवटची धाव!




वृक्ष प्राधिकरणाकडे मागितली परवानगी 

मेट्रो 3 प्रकल्पातील झाडांच्या कत्तलीचा वाद शांत होत नसताना 'एमएमआरसी' नव्याने झाडे कापण्यासाठी वृक्ष प्राधिकरणाकडे परवानगी मागत असल्याने हा वाद आणखी चिघळत आहे. दादर मेट्रो स्थानक आणि शीतलादेवी मेट्रो स्थानकाच्या कामासाठी वाहतूक वळवण्यात येणार आहे. या दोन्ही ठिकाणची एकूण 20 झाडे कापावी लागणार आहेत. माहीम येथे जमीन खोदण्याचे यंत्र बसवण्यासाठी 15 झाडे कापावी लागणार आहेत. त्यानुसार एकूण 35 झाडे कापण्यासाठी 'एमएमआरसी'ने वृक्ष प्राधिकरणाकडे परवानगी मागितली आहे. मात्र 'एमएमआरसी'ला अचानक आणखी झाडे कापण्याची कशी आठवण झाली? असा प्रश्न उपस्थित करत 'सेव्ह ट्री'ने 'एमएमआरसी'वर टीका केली.


'एमएमआरसी' अधिकाऱ्यांचा बोलण्यास नकार

'एमएमआरसी'च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी यासंबंधी संपर्क साधला असता त्यांनी याविषयी आपल्याला काही माहिती नसल्याचे सांगत बोलण्यास नकार दिला. 'सेव्ह ट्री'ने मात्र, ही झाडे कापण्यास विरोध केला आहे. एका बाजूला आम्ही झाडे वाचवण्याचा प्रयत्न करत असतानाा प्राधिकारण आणखी झाडांचा बळी घेऊ पाहत असल्याची टीका करत 'सेव्ह ट्री'ने प्राधिकरणाच्या कारभारावर प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.


हे देखील वाचा - अखेर नव्या 'ट्री सर्जन'ची एमएमआरसीकडून नियुक्ती!


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट


मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा


(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा