Advertisement

अखेर नव्या 'ट्री सर्जन'ची एमएमआरसीकडून नियुक्ती!


अखेर नव्या 'ट्री सर्जन'ची एमएमआरसीकडून नियुक्ती!
SHARES

कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो-3 मार्गासाठी 22 लाख पगाराच्या सिंगापुरमधील सिमाँग लिआँग ऐवजी दुसऱ्या नव्या ट्री सर्जनची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती अखेर 'मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन'कडून देण्यात आली आहे. सिमाँग लिआँगने आपली नियुक्ती मेट्रो-3 मध्ये झाली नसल्याचा मेल 'सेव्ह ट्री'ला पाठवल्याने एमएमआरसीने सिमाँग लिआँगची नियुक्ती केली नसल्याबद्दलचे वृत्त बुधवारी प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध झाले. या वृत्तानंतर अखेर एमएमआरसीने एक प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करत सिमाँग लिआँगच्या ऐवजी नव्या ट्री सर्जनची नियुक्ती करण्यात आल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. तर हा ट्री सर्जन कामाला लागला असून, या ट्री सर्जनच्या देखरेखीतच काम सुरू असल्याचीही माहिती एमएमआरसीकडून देण्यात आली आहे. ट्री सर्जनवरून सुरू असलेल्या सर्व आरोपाचे खंडणही एमएमआरसीने या स्पष्टीकरणाद्वारे केले आहे.


हेही वाचा - 

मेट्रोसाठी बोलावला 34 लाखांचा ट्री सर्जन

22 लाख पगाराचा 'ट्री सर्जन' गेला कुणीकडे?

22 लाख पगाराच्या ट्री सर्जनच्या नियुक्तीचा फार्सच !


झाडांची कत्तल आणि पुनर्रोपन सुरू असताना ट्री सर्जन कुठेही दिसला नसल्याचे म्हणत 'सेव्ह ट्री'ने ट्री सर्जन आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित केला होता. तर या ट्री सर्जनचा शोध 'सेव्ह ट्री'ने घेतला असता आपली नियुक्ती मेट्रो-3 साठी झाली नसल्याची माहिती सिमाँग लिआँनने ई-मेलद्वारे 'सेव्ह ट्री'ला दिली. त्यामुळे ट्री सर्जनच्या नियुक्तीचा फार्स असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली. ट्री सर्जन नसल्यासंबंधी 'सेव्ह ट्री'ने उच्च न्यायालयाच्या समितीकडे तक्रारही केली. तर यासंबंधीचे वृत्तही प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध झाले. त्यानंतर मात्र एमएमआरसीने पुढे येत ट्री सर्जन नियुक्त केला असून, तो सिमाँग लिआँग नसून दुसरा ट्री सर्जन असल्याचे सांगण्यात आले आहे. एमएमआरसीच्या या स्पष्टीकरणामुळे ट्री सर्जनबाबतचा गोंधळ अखेर दूर झाला आहे.

एमएमआरसीने दिलेल्या माहितीनुसार, 1 जून 2017 रोजी रिक थॉमस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आधीचा ट्री सर्जन खूपच खर्चिक असल्याने थॉमस यांची नियुक्ती करण्यात आली असून, थॉमस यांच्या देखरेखीतच झाडांच्या कत्तलीचे आणि पुनर्रोपनाचे काम होत आहे. तर थॉमस हे वर्कशॉपद्वारे अधिकाऱ्यांचे प्रशिक्षणही घेत असल्याचेही एमएमआरसीकडून सांगण्यात आले आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा