Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
55,601
3,028
Maharashtra
6,39,075
62,194

मेट्रो 3 : झाडांची कत्तल रोखण्यासाठी शेवटची धाव!


मेट्रो 3 : झाडांची कत्तल रोखण्यासाठी शेवटची धाव!
SHARES

मेट्रो 3 प्रकल्पात अडचणीच्या ठरणाऱ्या कुलाबा, चर्चगेट, मुंबई सेंट्रल, सिद्धिविनायक परिसरातील 150 ते 500 वर्षे जुन्या झाडांचीही बेपर्वाईने कत्तल केली जात आहे. ही कत्तल रोखण्यासाठी सत्तरी पार केलेल्या निना वर्मा यांनी सरकारविरोधात न्यायालयीन लढाई लढली. या लढाईत त्या अपयशी झाल्या असल्या तरी त्यांनी अजूनही हार मानलेली नाही. त्यामुळेच 'सेव्ह ट्री' ग्रुपमधील सदस्यांच्या मदतीने मेट्रो-3 प्रकल्पांतर्गत येणारी उरली सुरली झाडे वाचवण्यासाठी त्यांनी आता मुंबई उच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या न्यायाधीशांच्या समितीलाच साकडे घातले आहे.


रस्त्यातच गाठले समिती सदस्यांना -

न्यायाधीशांची समिती बुधवारी सकाळी मेट्रो-3 प्रकल्पातील झाडे तोडण्याच्या कामाचा आढावा घेणार असल्याचे समजातच निना वर्मासह 'सेव्ह ट्री'च्या सदस्यांनी समिती भेट देणार असलेल्या ठिकाणी धाव घेत त्यांना गाठले. यावेळी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी)ने कशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने झाडांची कत्तल चालवली आहे, पुनर्रोपनाचे कामही व्यवस्थितरित्या होत नसल्याचे म्हणणे सेव्ह ट्री'च्या सदस्यांनी या समितीपुढे मांडत उरली सुरली झाडे वाचवण्याची कळकळीची विनंती केली.

हे वाचा - मुंबई मेट्रोने कोचीकडून शिकावं


अशी झाली समितीची स्थापना -

मेट्रो-3 प्रकल्पातील झाडांच्या कत्तलीविरोधात उच्च न्यायालयात वर्मा यांनी याचिका दाखल केली. पण उच्च न्यायालयासह सर्वोच्च न्यायालयानेही झाडांच्या कत्तलीला हिरवा कंदील दिल्याने झाडांची कत्तल सुरू झाली. मात्र त्याचवेळी उच्च न्यायालयाने न्यायाधीशांची एक विशेष समिती स्थापन करत याचिकाकर्त्यांच्या यासंदर्भातील तक्रारी दूर करण्याचे आदेश दिले. ही समिती या कामावर लक्ष ठेवेल, असेही न्यायालयाने नमूद केले होते.


समितीने दिला सकारात्मक प्रतिसाद -

त्यानुसार न्यायाधीशांची समिती स्थापन झाली असून बुधवारी कफ परेड, चर्चगेटसह मेट्रो-3 मार्गीतील अन्य ठिकाणांची पाहणी या समितीने केली. यावेळी 'सेव्ह ट्री'ने झाडे वाचवण्यासाठी मार्गात काही बदल करता येईल का, डिझाईनमध्ये बदल करता येईल का? याची चाचपणी करण्यास 'एमएमआरसी'ला सांगावे, अशी विनंती केल्याची माहिती 'सेव्ह ट्री'चे अश्विन नागपाल यांनी दिली. या समितीनेही आपले म्हणणे योग्य प्रकारे एेकून घेत सकारात्मक प्रतिसाद दिल्याने या समितीकडून अपेक्षा असल्याचेही नागपाल यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता ही समिती झाडांच्या कत्तलीप्रकरणी नेमकी काय भूमिका घेते? याकडेच 'सेव्ह ट्री'चे लक्ष लागले आहे.

हे देखील वाचा - मोटरमनशिवाय धावणार मेट्रो


डाऊनलोड कराMumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा