मध्य रेल्वेच्या मोटरमननं लघुशंकेसाठी थांबवली लोकल

मध्य रेल्वेच्या विठ्ठलवाडी ते उल्हासनगर स्थानकादरम्यान लोकल वेगळ्याच कारणामुळं थांबली होती. कोणताही बिघाड झाला नसताना मोटरमननं लघुशंका आल्यानं लोकल थांबवल्याचा प्रकार समोर आला.

SHARE

मध्य रेल्वेची वाहतूक नेहमीच तांत्रिक बिघाड, ओव्हरहेड वायर तुटली यांसारख्या अनेक कारणात्सव विस्कळीत होत असते. मात्र, बुधवारी मध्य रेल्वेच्या विठ्ठलवाडी ते उल्हासनगर स्थानकादरम्यान लोकल वेगळ्याच कारणामुळं थांबली होती. कोणताही बिघाड झाला नसताना मोटरमननं लघुशंका आल्यानं लोकल थांबवल्याचा प्रकार समोर आला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसंच, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वेनं त्यावर प्रतिक्रिया देत हे नैसर्गिक कृत्य असल्याचं सांगत यावर कारवाईची तरतूद नसल्याचं म्हटलं.

व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल झालेला एका प्रवाशानं काढला असून, या व्हिडीओमध्ये मोटरमन ट्रेन थांबवून रेल्वे रूळांवर लघुशंका करताना दिसत आहे. तसंच, त्यानंतर तो पुन्हा लोकलच्या केबीनमध्ये जाऊन गाडी सुरू करतो. मात्र मोटरमननं अचानक दोन स्थानकांच्या मध्ये लोकल थांबवल्यानं प्रवाशांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माणं झालं होतं. परंतु, याबाबत कोणत्याही प्रवाशानं तक्रार केली नाही.


नैसर्गिक कृत्य

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक स्तरावरून प्रतिक्रीया येत आहेत. तसंच, काहींना 'मोटरमन हा देखील माणूस आहे', असं म्हटलं आहे. त्याशिवाय, रेल्वेनंही हे नैसर्गिक कृत्य असल्याचे सांगत यावर कारवाईची तरतूद नसल्याचं म्हटलं.हेही वाचा -

‘आयडॉल’च्या अनेक विद्यार्थ्यांना कला शाखेच्या प्रथम वर्षांच्या परीक्षेत शून्य गुण

कोस्टल रोड प्रकल्पाबाबत महापालिका सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यतासंबंधित विषय
ताज्या बातम्या