Advertisement

‘आयडॉल’च्या २३६ विद्यार्थ्यांना एफवायबीएच्या निकालात शून्य गुण

मुंबई विद्यापीठाच्या दूर आणि मुक्त शिक्षण केंद्राच्या (आयडॉल) कला शाखेच्या प्रथम वर्षांच्या परीक्षेत शेकडो विद्यार्थ्यांना शून्य गुण मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

‘आयडॉल’च्या २३६ विद्यार्थ्यांना एफवायबीएच्या निकालात शून्य गुण
SHARES

मुंबई विद्यापीठाच्या दूर आणि मुक्त शिक्षण केंद्राच्या (आयडॉलकला शाखेच्या प्रथम वर्षांच्या परीक्षेत शेकडो विद्यार्थ्यांना शून्य गुण मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहेमंगळवारी जाहीर झालेल्या बीएच्या प्रथम वर्षाच्या निकाल जाहीर झाला होताया निकालामध्ये तब्बल २३६ विद्यार्थ्यांना विविध विषयांमध्ये शून्य गुण मिळाले आहेतत्यामुळं पुन्हा एकदा आयडॉल आणि विद्यापीठाच्या परीक्षा चर्चेत आल्या आहेत.

विद्यार्थ्यांना मोठा धक्का

या निकालामुळं नोकरी करून शिक्षण घेणाऱ्या तसंच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून पुढील शिक्षणासाठी झटणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आहेतसंचनिकालात झालेल्या या गुणगोंधळामुळं अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त करतत्यांच्याकडून पेपर पुनर्मूल्यांकनाचं शुल्क न घेण्याची मागणी केली आहे.

१६ जुलैला निकाल जाहीर

'आयडॉल'नं एप्रिल-मेमध्ये घेतलेल्या प्रथम वर्ष बीए परीक्षेसाठी सात हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होतीत्यापैकी ५ हजार ९० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होतीया परीक्षेचा निकाल १६ जुलै रोजी जाहीर करण्यात आलापरीक्षेचा निकाल ४३ टक्के लागला असूनपरीक्षेत तब्बल २३६ विद्यार्थ्यांना विविध विषयांमध्ये शून्य गुण मिळाले आहेतत्यापैकी २१३ विद्यार्थ्यांना एका विषयात शून्य गुण मिळाले आहेततर १८ विद्यार्थ्यांना २ विषयांत विद्यार्थ्यांना ३ विषयांत व एका विद्यार्थ्याला ४ विषयांत शून्य गुण मिळाले आहेतत्यामुळं प्रश्नपत्रिका पूर्ण सोडवल्यानंतरही शून्य गुण कसे मिळू शकतात असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.

आंदोलनाचा इशारा

'अनेक विद्यार्थ्यांना शून्य गुणदोन गुण मिळाले आहेतविद्यापीठानं पुनर्मूल्यांकनाचे शुल्क न घेता या विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवावा अन्यथा विद्यापीठाविरोधात आंदोलन करण्यात येईल’असा इशारा स्टुडंट लॉ काऊन्सिलचे अ‍ॅडसचिन पवार यांनी दिला आहे.

निकाल प्राधान्याने जाहीर

'प्रथम वर्ष बीए परीक्षेला एकूण ५०९० विद्यार्थी बसले होतेसर्वच विषयांत विद्यार्थ्यांना शून्य गुण मिळालेले नाहीतजर विद्यार्थी निकालाबाबत असमाधानी असेल तर ते पुनर्मूल्यांकन व छायाप्रतीसाठी अर्ज करू शकतातया विद्यार्थ्यांचे निकाल प्राधान्याने जाहीर करण्यात येतील', अशी माहिती मुंबई विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी विनोद माळाळे यांनी दिली.



हेही वाचा -

कोस्टल रोड प्रकल्पाबाबत महापालिका सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता

मुंबई सेंट्रल येथील टॅक्सी चालकांवर आरपीएफची कारवाई


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा