Advertisement

मुंबई सेंट्रल येथील टॅक्सी चालकांवर आरपीएफची कारवाई

पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्थानकाबाहेर प्रवाशांकडून जास्तीचं भाडं आकराणाऱ्या टॅक्सी चालकांवर मुंबई सेट्रलच्या रेल्वे सुरक्षा दलानं कारवाई केली आहे.

मुंबई सेंट्रल येथील टॅक्सी चालकांवर आरपीएफची कारवाई
SHARES

पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्थानकाबाहेर प्रवाशांकडून जास्तीचं भाडं आकराणाऱ्या टॅक्सी चालकांवर मुंबई सेट्रलच्या रेल्वे सुरक्षा दलानं कारवाई केली आहे. प्रवाशांना कडून अवाचे सवा भाडे आकारणाऱ्या, मीटरवर टॅक्सी न चालविणाऱ्या, जवळचं भाडं नाकारणाऱ्या २२ टॅक्सी चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

रेल्वे कायद्यानुसार कारवाई

मुंबई सेंट्रल टर्मिनस इथं बाहेगावाहून आलेल्या प्रवाशांनं एका टॅक्सी चालकाला घाटकोपरला जायचं असं सांगितलं. त्यावेळी टॅक्सी चालकानं त्या प्रवाशाकडं मीटरशिवाय घाटकोपरला जायचे ७०० रुपये मागितलं. जास्तीचं भाडं सांगितल्यानं त्या प्रवाशानं मुंबई सेंट्रलच्या आरपीएफकडं याबाबत तक्रार केली. त्यानंतर आरपीएफनं प्रवाशांकडून आशा पद्धतीनं भाडं आकारणाऱ्या २२ टॅक्सी चालकांवर रेल्वे कायद्यानुसार कारवाई केली. त्याशिवाय, लांबचे भाडे मिळण्यासाठी विनाकारण जागा अडवून ठेवणाऱ्या टॅक्सीचालकांवरही कारवाई करण्यात आली आहे.

३०० रुपये दंड

कारवाई करण्यात आलेल्या २२ टॅक्सीचालकांना न्यायालयानं कोर्ट संपेपर्यंत न्यायालयातच थांबण्याचे आदेश दिले असून, ३०० रुपये दंड भरण्याचेही आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणं स्थानकाबाहेर काही जण गाड्या पार्क करीत होते. त्या गाड्याही ट्राफिक पोलिसांच्या मदतीनं टोईंग व्हॅन बोलावून हटविण्यात आल्या आहेत.हेही वाचा -

‘बेस्ट ट्रॅफिक व्हायोलेशन’ मोहिमेला प्रवाशांचा चांगला प्रतिसादRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा