Advertisement

'इतक्या' एसटी कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळं मृत्यू

मुंबईसह राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या कोरोनामुळं अनेकांना आपला जीव गमवावा लागला. यामध्ये एसटी, पोलीस व रेल्वेच्या अनेक कर्मचाऱ्यांनी नागरिकांना सेवा देताना आपला जीव गमवला आहे.

'इतक्या' एसटी कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळं मृत्यू
SHARES

मुंबईसह राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या कोरोनामुळं अनेकांना आपला जीव गमवावा लागला. यामध्ये एसटी, पोलीस व रेल्वेच्या अनेक कर्मचाऱ्यांनी नागरिकांना सेवा देताना आपला जीव गमवला आहे. गेल्या वर्षभरात कोरोनाकाळात मुंबई उपनगरीय रेल्वेच्या सेवेसाठी कर्तव्य बजावणारे ७२४ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

एसटीतील कोरोनाबाधित अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या वाढत असून उपचाराच्या अपुऱ्या मदतीमुळे महामंडळही हतबल झाले आहे. २१ एप्रिल ते २६ एप्रिल या सहा दिवसांत २६ एसटी कर्मचाऱ्यांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एसटीतील मृतांचा आकडा १७८ पर्यंत पोहोचला असून कर्मचाऱ्यांना तात्काळ वैद्यकीय मदत मिळण्याकरिता समन्वय कक्ष स्थापन करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.

गेल्या वर्षभरात कोरोनाकाळात एसटीचे चालक, वाहकांपासून अनेक कर्मचारी आपले कर्तव्य पार पाडत आहेत. कर्तव्य पार पाडताना एसटीतील कर्मचाऱ्यांना करोनाची लागण होत गेली. बाधित अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे; परंतु कर्मचारी स्वत:हून रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्यानंतरही त्यांची विचारपूस तसेच वैद्यकीय मदतही के ली जात नसल्याने एस.टी. महामंडळात नाराजीचा सूर उमटू लागला आहे. याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

कोरोनाबाधित एसटी कर्मचाऱ्यांची संख्या वाढत असल्याने यासंदर्भात शुक्रवारी एसटी महामंडळानं परिपत्रक काढलं. कोरोना बाधित होणाऱ्यांची संख्या पाहता समन्वय कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचे परिपत्रकातून जाहीर करण्यात आले. एकीकडे करोनाबाधित कर्मचारी संख्या वाढत असताना दुसरीकडे कर्मचाऱ्यांचं लसीकरणही वेगाने होत आहे. १ लाख कर्मचाऱ्यांपैकी २३ हजार ७५६ कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली. जवळपास २४ टक्के कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण झालं आहे.

मध्य रेल्वेवरील सीएसएमटी ते कल्याण, खोपोली, कसारा, पनवेल, तसेच चर्चगेट ते डहाणूपर्यंतची सुरक्षा लोहमार्ग पोलिसांकडे आहे. मार्च २०२० पासून महाराष्ट्रात करोना संसर्गाचे प्रमाण दिसू लागताच मुंबई उपनगरीय रेल्वेत कर्तव्यावर असलेल्या लोहमार्ग पोलिसांनाही कोरोनाची लागण होण्यास सुरुवात झाली. परंतु त्याचं प्रमाण कमी होते. लॉकडाऊन होताच पोलिसांना कर्तव्यावरील उपस्थितीत बदल करण्यात आले. परिणामी कर्तव्यावर हजर राहणाऱ्या पोलिसांचे प्रमाण कमी होते. हळूहळू कामगारांसाठी श्रमिक रेल्वे चालवण्यास सुरुवात केली.  

एप्रिल २०२० ते एप्रिल २०२१ या कालावधीत ७२४ पोलीस अधिकारी व कर्मचारी कोरोनाबाधित झाले. तर ६ जणांचा मृत्यू झाला. ६८० पोलीस करोनामुक्त झाल्याची माहिती लोहमार्ग पोलीस मुख्यालयाकडून देण्यात आली. साधारण सप्टेंबर २०२० पर्यंत ४५८ लोहमार्ग पोलिसांना करोनाची लागण झाली होती. तर चौघांचा मृत्यू झाला होता. वडाळा, मुंबई सेन्ट्रल, सीएसएमटी लोहमार्ग पोलीस ठाण्यांर्तगत कर्मचारी अधिक बाधित झाले आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा