Advertisement

कुर्ला पूर्व परिसरात चार मजली इमारत कोसळली, रहिवाशी अडकल्याची भीती

कुर्ला पूर्व भागातील नाईक नगर परिसरातील चार मजली इमारत सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास कोसळली.

कुर्ला पूर्व परिसरात चार मजली इमारत कोसळली, रहिवाशी अडकल्याची भीती
SHARES

कुर्ला पूर्व भागातील नाईक नगर परिसरातील चार मजली इमारत सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास कोसळली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन मदतकार्य सुरू केले आहे. आतापर्यंत पाचजणांना वाचवण्यात यश आले असून ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस, स्थानिक लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने मदतकार्य सुरू आहे.

नाईक नगर परिसरातील एकमेकांना खेटून असलेल्या चार इमारती धोकादायक असल्याने पालिकेने रहिवाशांना स्थलांतर करण्याची सूचना दिली होती. मात्र रहिवाशांनी इमारती रिकाम्या केल्या नव्हत्या. 

सोमवारी रात्री 11.52 वाजता अग्निशमन दलाला फोन आला. पाच जण जखमी झाले असून त्यांना स्थानिकांनी बाहेर काढले.

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की त्यांनी सात फायर ट्रक, दोन रेस्क्यू व्हॅन आणि रुग्णवाहिका पाठवल्या आहेत. अग्निशमन दलाने मात्र जवळपास 20 लोक आत अडकल्याची शक्यता वर्तवली आहे.

नगरसेविका प्रविणा मोरजकर म्हणाल्या, चार मोडकळीस आलेल्या इमारतींची ही वसाहत असून त्यांना पाच ते सहा वर्षांपूर्वी रिकामी करण्याच्या नोटीस देण्यात आल्या होत्या. तरीही रहिवासी कायम राहिले. सोमवारी रात्री एक इमारत कोसळली. मात्र अग्निशमन दल येण्यापूर्वीच पाच ते सहा जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले. त्यांच्यावर उपचार केले जात आहेत आणि जखमींना रुग्णालयात पाठवले जात आहे.”

उर्वरित तीन इमारतींचे भाडेकरू मंगळवारी सकाळी बीएमसी स्थलांतरित करणार असल्याचे मोरजकर यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, बीएमसीने भाडेकरूंना इमारती रिकामी करण्याचा इशारा दिला होता.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा