Advertisement

येथे गरज नसतानाही पालिकेने खोदला तलाव


येथे गरज नसतानाही पालिकेने खोदला तलाव
SHARES

तहान न लागताच म्हणजे काही गरज नसतानाही पालिकेने मुलुंडमध्ये कृत्रिम तलाव बांधण्याचा घाट घातला आहे. मुलुंड पूर्वेकडील अरुणोदयनगरमधील मावळा जिवा महाला या छोट्या मैदानात पालिकेकडून गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव बांधण्यात येत आहे. यालाच तेथील स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध आहे.


काही महिन्यांपूर्वीच पालिकेने याच जिवा महाला उद्यानाच्या दुरुस्ती आणि ओपन जिमसाठी लाखो रुपये खर्च केले होते. आता पुन्हा कृत्रिम तलावासाठी गरज नसताना तब्बल 2 लाख 45 हजारांचा खर्च केला जात आहे.


मुलुंड पूर्वेकडे गणेश विसर्जनासाठी आधीच दोन तलाव सुस्थितीत आहेत. मग हे आणखी एक तलाव कशाला असा सवाल उपस्थित केला जात आहे. या उद्यानालगतच शाळा असल्याने तलाव बांधल्यास भविष्यात सुरक्षेचा प्रश्न आणि डासांचा देखील प्रश्न उद्भवू शकतो असे तेथील रहिवाशांचे मत आहे. तरीही पालिकेने इथे तलावाचे काम सुरू केले. मात्र संतप्त नागरिकांनी हे काम आता बंद पाडले आहे. मात्र भाजपाच्या नगरसेविका रजनी केणी यांनी हे सर्व निर्णय पालिका टी वॉर्ड कडून घेतले गेल्याचे सांगून आपले हात झटकले आहेत.


तेव्हा तलाव खोदायचाच असेल तर तो मुलुंडमधील नीलमनगर येथील पालिकेच्या मोकळ्या जागेत खणावा, अशी मागणी अरुणोदय मित्र मंडळाचे अध्यक्ष अजित घागरे यांनी केली आहे.


हेही वाचा - 

पावसाचे पाणी जातेय वाया, तलाव भरूनही महापालिका चिंतेत

महापालिका बांधणार आठ नवे तरण तलाव


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा