Advertisement

भायखळा प्राणीसंग्रहालयात २३ हजार पर्यटकांनी लावली हजेरी

१ नोव्हेंबरपासून भायखळा प्राणीसंग्रहालय सर्वांसाठी खुले झाले आहे.

भायखळा प्राणीसंग्रहालयात २३ हजार पर्यटकांनी लावली हजेरी
(File Image)
SHARES

शनिवार, ६ नोव्हेंबर आणि रविवार ७ नोव्हेंबर या दोन दिवसांत एकूण महसूल ९.२७ लाख होता. एकट्या रविवारी, १३ हजार ०९२ पर्यटक प्राणीसंग्रहालयात आले.

COVID-19 च्या दुसऱ्या लाटेनंतर आठ महिने बंद राहिल्यानंतर १ नोव्हेंबर रोजी प्राणीसंग्रहालय पुन्हा सर्वांसाठी खुले झाले. आठवड्याच्या शेवटी पर्यटकांची संख्या १५ हजार पर्यंत गेली.

पहिल्या दिवशी, प्राणीसंग्रहालयाला १ हजार ६२१ पर्यंटकांनी भेट दिली आणि ६८ हजार ७२५ रुपये महसूल जमा झाला. प्री-कोविड वेळेत आठवड्याच्या दिवसात पर्यटकांची नेहमीची संख्या ५००० ते ६००० इतकी होती.

यापूर्वी, ते जवळपास वर्षभर बंद होते आणि नंतर या वर्षी फेब्रुवारीमध्ये पुन्हा लोकांसाठी खुले करण्यात आले. त्यानंतर, पहिल्या वीकेंडमध्ये ११ हजार पर्यटकांनी भेट दिली. तथापि, कोरोनाव्हायरस प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे आणि दुसऱ्या लाटेमुळे लॉकडाऊन लागू झाल्यामुळे, ते पुन्हा लोकांसाठी बंद करण्यात आले.



हेही वाचा

SRA ची घरं आता ५ वर्षांनंतर विकण्यास परवानगी, फक्त आहे 'ही' अट

ठोस निकाल येईपर्यंत एसटी कर्मचारी संपावर ठाम

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा