Advertisement

मोसमी पावसामुळं मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक उत्तम


मोसमी पावसामुळं मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक उत्तम
SHARES

मुंबईत मागील अनेक दिवसांपासून पडत असलेल्या मोसमी पावसामुळं मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक उत्तम आहे. मुंबई हे समुद्रकिनारी वसलेले शहर असल्यानं बऱ्याचदा इथं स्थानिक वातावरण आणि सार्वत्रिक वातावरणातील बदल यांचा एकत्रित परिणाम जाणवतो. त्यामुळं लॉकडाऊनमध्ये उद्योगधंदे आणि वाहतूक बंद असताना हवा पूर्णपणे शुद्ध होऊ शकली नव्हती.

भोवतालच्या प्रदेशातून वाहत येणाऱ्या घातक सूक्ष्मकणांमुळे टाळेबंदीतही मुंबईची हवा काही प्रमाणात अशुद्धच होती; सोमवारी मात्र हवेचा दर्जा सुधारल्याचे दिसून आले. सोमवारी पीएम २.५ चे (२.५ मायक्रॉन जाडीचा घातक सूक्ष्मकण) प्रमाण भांडुप, मालाड, माझगाव, वरळी, बोरिवली, चेंबूर, अंधेरी येथे शून्य होते. येथील पीएम १०चे (१० मायक्रॉन जाडीचा घातक सूक्ष्मकण) प्रमाण साधारण १५ ते २८ इतके  होते. त्यामुळे या सर्व ठिकाणचा ‘हवा गुणवत्ता निर्देशांक’ उत्तम होता. वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथे पीएम १० चे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ५२ इतके  होते; मात्र हा स्तर समाधानकारक समजला जातो.

पीएम १० चे प्रमाण मालाड आणि भांडुप येथे सर्वात कमी म्हणजे अनुक्रमे १३ आणि १५ असे होते. संपूर्ण मुंबईत घातक सूर्यकिरणांचे प्रमाणही खूपच कमी म्हणजे ०.९ इतके  होते.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा