Advertisement

मुंबई विमानतळावर कार पार्किंगमध्ये आता डिजीटल पेमेंट सिस्टिम

या कॅशलेस पेमेंट प्रक्रियेचा उद्देश पेमेंट सिस्टम सुलभ करणे, प्रतीक्षा वेळ कमी करणे आणि प्रवाशांना उत्तम पार्किंगची सेवा प्रदान करणे आहे.

मुंबई विमानतळावर कार पार्किंगमध्ये आता डिजीटल पेमेंट सिस्टिम
SHARES

मुंबईतील (mumbai) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) येथून प्रवास करणारे प्रवासी मल्टी-लेव्हल कार पार्किंग (multi level car parking) मध्ये प्रवेश करण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी स्वयंचलित डिजिटल पेमेंट (Digital Payment) सिस्टमचा वापर करू शकतात.

या कॅशलेस पेमेंट प्रक्रियेचा उद्देश पेमेंट सिस्टम सुलभ करणे, वेटींग पिरेड कमी करणे आणि प्रवाशांना उत्तम पार्किंगची सेवा प्रदान करणे आहे.

कॅशलेस उपक्रम भारत सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमाला चालना देत आहे. यामुळे MLCP चे वापरकर्ते मोबाइल वॉलेट्स, डेबिट/क्रेडिट कार्ड्स, UPI किंवा इतर ऑनलाइन पेमेंट पद्धतींसारख्या विविध डिजिटल पर्यायांचा वापर करून पार्किंगसाठी पैसे देऊ शकतात.

एंट्री आणि एक्झिटची गती वाढविण्यासाठी MLCP मधील सर्व ग्राहक मार्गांवर FASTag काउंटर आहेत. CSMIA च्या मल्टी-लेव्हल कार पार्किंग (MLCP) मधील FASTag वापरकर्ते स्वयंचलित पार्किंग प्रक्रियेचा वापर करू शकतात. ज्यामुळे पावत्या किंवा रोख/कार्ड पेमेंट जलद पार पडू शकते.

सध्या, CSMIA च्या MLCP मध्ये 66 टक्के वापरकर्ते त्यांच्या पेमेंटच्या प्राथमिक पद्धती म्हणून FASTag निवडतात. तर 10-15 टक्के वापरकर्ते UPI, क्रेडिट किंवा डेबिट कार्ड पर्याय निवडतात.

विमानतळावरील (mumbai airport) प्रवाशांना नवीन डिजिटल पेमेंट पर्याय उपलब्ध करून तो वापरण्यास प्रोत्साहीत करण्यात येणार आहे. CSMIA सर्व प्रवाशांना जागतिक दर्जाचा अनुभव देण्यासाठी प्रयत्न करत आहे.



हेही वाचा

महाराष्ट्रातील कामांसाठी अर्थसंकल्पातील फक्त 43% निधीचा वापर

महालक्ष्मीत दोन नवीन उड्डाणपूल उभारण्यात येणार

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा