Advertisement

1 ऑक्टोबरपासून ऑटो, टॅक्सी भाडेवाढ लागू, जाणून घ्या नवीन दर

महाराष्ट्र सरकारने अखेर ऑटोरिक्षा आणि टॅक्सी युनियनची मुंबईतील किमान भाडे वाढवण्याची मागणी मान्य केली आहे.

1 ऑक्टोबरपासून ऑटो, टॅक्सी भाडेवाढ लागू, जाणून घ्या नवीन दर
(File Image)
SHARES

मुंबईतही (Mumbai) रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास महागणार आहे. मुंबईत रिक्षाची दोन रुपयांनी तर टॅक्सीची तीन रुपयांनी भाडेवाढ होणार आहे. रिक्षा आणि टॅक्सीचे किमान भाडे अनुक्रमे 23 व 28 रुपये करण्यास मुंबई महानगर प्राधिकरणाकडून अखेर मंजुरी देण्यात आली आहे.

मुंबईत येत्या शनिवारी म्हणजेच 1 ऑक्टोबर 2022 पासून रिक्षाचे (Auto) किमान भाडे 23 रुपये आणि टॅक्सीचे किमान भाडे 28 रुपये होणार आहे. रिक्षा टॅक्सी संघटनानी दिलेल्या संपाच्या ईशाऱ्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून सीएनजी गॅसच्या दरात वाढ होत आहे. राज्य सरकारने अर्थसंकल्पात सीएनजी गॅसच्या दरात कपात केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने सीएनजी गॅसच्या दरात मोठी वाढ केली.

सध्या सीएनजी गॅसचा दर 80 रुपयांच्या घरात पोहचला आहे. राज्यातील बहुतांशी रिक्षा-टॅक्सी या सीएनजी गॅस आधारीत आहेत. त्यामुळे या दरवाढीचा फटका रिक्षा-टॅक्सी चालकांना बसत होता.

मुंबई महानगर प्रदेशात रिक्षा टॅक्सीचे सुधारित भाडे 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू होणार आहे. ऑटोरिक्षासाठी प्रवाश्यांना पहिल्या 1.5 किमीसाठी 21 वरून 23 रुपये मोजावे लागणार आहे तर टॅक्सीसाठी पहिल्या 1.5 किमीसाठी 25 वरून 28 रुपये मोजावे लागणार. कूल कॅब एसीसाठी आता नागरिकांना किमान भाडे (पहिल्या 1.5 किमीसाठी) 40 रुपये होणार आहे.

मुंबई महानगर प्रदेशात आधी रिक्षाचे किमान भाडे 21 रुपये आणि प्रत्येक किमीकरिता 14.20 रुपये, टॅक्सीचे किमान भाडे 25 रुपये प्रत्येक किमीकरिता 16.93 रुपये तर कूल कॅब एसीचे किमान भाडे 33 रुपये प्रत्येक किमीकरिता 22.96 रुपये होते.



हेही वाचा

राज्यातील शिवभोजन थाळी योजना सुरूच राहणार

विद्यार्थ्यांची झोप महत्त्वाची! राज्य सरकार 'या' निर्णयाच्या विचारात

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा