Advertisement

राज्यातील शिवभोजन थाळी योजना सुरूच राहणार

महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू झालेली शिवभोजन थाळी बंद होणार अशी चर्चा सुरू झाली होती.

राज्यातील शिवभोजन थाळी योजना सुरूच राहणार
SHARES

महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू झालेली शिवभोजन थाळी (shivbhojan Thali) बंद होणार अशी चर्चा सुरू झाली होती. पण महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेली शिवभोजन थाळी योजना सुरूच राहणार अशी माहिती समोर आली आहे.

शिंदे गट आणि भाजप युतीचे सरकार राज्यात विराजमान झाल्यावर महाविकास आघाडी सरकारचे अनेक निर्णय रद्द केले. त्यानंतर शिंदे सरकार शिवभोजन थाळी योजना देखील रद्द करण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र, शिवभोजन थाळी योजना सुरूच राहणार असणार अशी माहिती समोर आली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांना आश्वासन दिलं आहे. शिवभोजन थाळी सुरू ठेवावी की नाही? याबाबत सोमवारी आढावा घेण्यात आला. याची माहिती मिळाल्यानंतर माजी मंत्री भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना संपर्क केला, तेव्हा फडणवीस यांनी शिवभोजन थाळी बंद करणार नसल्याचे आश्वासन भुजबळ यांना दिले आहे.

शिवभोजन थाळी योजनेत गैरव्यवहार झाल्याचा संशय शिंदे-फडणवीस सरकारला आहे. त्यामुळ ही योजना बंद होण्याची शक्यता आहे. ही योजना बंद झाल्यास गरजूंना मोठा फटका बसणार होता. पण उपमुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर गरजूंची चिंता मिटली आहे.

महाविकास आघाडीच्या काळात शिवभोजना थाळी योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेतंर्गत १० रुपयात जेवण मिळत होते. कोरोना काळात याच थाळीचे दर ५ रुपये करण्यात आले होते.

राज्यात एक लाख 88 हजार 463 एवढ्या थाळ्यांची विक्री होते. शिवभोजन थाळीसाठी विविध ठिकाणी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. ही केंद्र चालवणाऱ्यांना राज्य सरकारकडून विविध मदत दिली जाते.



हेही वाचा

दादरमधल्या ८ मजली इमारतीला आग

फर्स्ट क्लासच्या प्रवाशांनाही AC लोकलने प्रवास करता येणार, फक्त...

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा