Advertisement

मुंबई वांद्रे स्कायवॉक 2026 पर्यंत पूर्ण होणार

एमएमआरडीएने 2008 मध्ये बांधलेला पूल 2019 मध्ये पाडला होता.

मुंबई वांद्रे स्कायवॉक 2026 पर्यंत पूर्ण होणार
SHARES

बहुप्रतिक्षित वांद्रे पूर्व स्कायवॉकच्या कामाला वेग आला आहे. या आर्थिक वर्षात स्कायवॉकचे काम  पूर्ण होण्याची शक्यता आहे. पाच वर्षांपूर्वी पाडण्यात आलेल्या स्कायवॉकमुळे हजारो पादचाऱ्यांना वांद्रे स्टेशन आणि जवळच्या कार्यालयांमध्ये ये-जा करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

आता कामाला सुरुवात झाली आहे. स्टेशनच्या बाहेर आणि कलानगर जंक्शनजवळ पश्चिम द्रुतगती महामार्गावर खांब बसवण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, नवीन स्कायवॉकचा वांद्रे स्टेशन पूर्वेपासून वांद्रे कोर्ट आणि पुढे म्हाडा इमारतीपर्यंत विस्तार करण्यात आला आहे. हा प्रकल्प मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

मुंबईतील पहिला मूळ स्कायवॉक, एमएमआरडीएने 2008 मध्ये बांधला होता. परंतु 2019 मध्ये तो बंद करण्यात आला आणि 2021 मध्ये तो पाडण्यात आला. सुरुवातीला 450 मीटरचा स्कायवॉक नियोजित होता. परंतु रहिवाशांच्या मागणीनुसार, म्हाडाला जोडण्यासाठी त्याची लांबी 750 मीटरपर्यंत वाढविण्यात आली.

स्कायवॉक नसल्यामुळे दैनंदिन प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला आहे. “एवढ्या छोट्या रस्त्यावर पूल बांधायला पाच वर्षे लागतात का? मॅजिस्ट्रेट कोर्टापासून वांद्रे स्टेशन पूर्वेपर्यंत चालण्यासाठी योग्य जागा नाही,” असे प्रवासी जयेश शाह म्हणाले.

नूर खान नावाच्या आणखी एका प्रवासीने पुढे म्हटले, “स्टेशनबाहेरील वाहतूक व्यवस्थापन गोंधळलेले आहे, दोन्ही लेनमध्ये पार्क केलेली वाहने रस्ता अडवतात आणि चालण्यासाठी जागा नाही.”

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन आणि विल्बर स्मिथ अँड असोसिएट्सच्या सर्वेक्षणानुसार, वांद्रे स्टेशनवरून दररोज सरासरी 4.91 लाख प्रवासी प्रवास करतात. ज्यामुळे ते चर्चगेट आणि अंधेरी नंतर पश्चिम रेल्वेवरील तिसरे सर्वात गर्दी असलेले स्थानक बनले आहे. हे स्टेशन सीएसएमटी आणि चर्चगेट दोन्ही गाड्यांसाठी तसेच वांद्रे टर्मिनसपासून लांब पल्ल्याच्या सेवांसाठी एक केंद्र म्हणून देखील काम करते.



हेही वाचा

मुंबईतील जलाशयात 51% पाणीसाठी शिल्लक, पालिकेकडून...

मुंबईतील मराठी शाळांच्या संख्येत घट

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा