Advertisement

मुंबईतल्या बेस्ट बसमध्ये मोबाईल, मौल्यवान वस्तू विसरलात? मग इथं साधा संपर्क

बेस्ट बसमध्ये मोबाईल विसरलेल्या प्रवाशांना काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न बेस्ट प्रशासनाने केला आहे.

मुंबईतल्या बेस्ट बसमध्ये मोबाईल, मौल्यवान वस्तू विसरलात? मग इथं साधा संपर्क
SHARES

बेस्ट बसमधून प्रवास करताना काहीजण आपल्या वस्तू विसरतात. काहीजण तर मोबाईलदेखील (Mobile Phone) विसरतात. काहींना मोबाईल पुन्हा मिळतात. तर, काही जण मोबाईल पुन्हा मिळवण्याच्या अपेक्षा सोडून देतात. बेस्ट बसमध्ये मोबाईल विसरलेल्या प्रवाशांना बेस्ट प्रशासनाने काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

बेस्ट बसमध्ये जानेवारी 2023 महिन्यात गहाळ झालेल्या आणि बेस्ट कडे जमा झालेल्या मोबाईल फोनची (Mobile phone ) यादी गहाळ वस्तू विभाग, संपर्काची अधिक माहिती बेस्ट उपक्रमाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

बेस्ट बसमध्ये 30 डिसेंबर 2022 ते 29 जानेवारी 2023 या कालावधीत जवळपास 40 मोबाईल फोन मिळाले आहेत. प्रवाशांनी या मोबाईलवर 15 मार्च 2023 पूर्वी दावे करावेत असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.


मोबाईल फोनवर दावा करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक

  • मोबाईलवर दावा करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे:
  • ओळखपत्र आणि निवासी पत्ता पुरावा उदा. आधार कार्ड, इलेक्शन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट इ.
  • कॅश मेमो / मोबाईलचे बिल
  • सीम कार्ड तपशील
  • मोबाईल हरवल्याबाबत पोलीस तक्राराची प्रत

कागदपत्रांची योग्य पडताळणी केल्यानंतरच दावेदाराला मोबाईल दिला जाईल असेही बेस्टने प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

  • मौल्यवान वस्तू (म्हणजे सोने, चांदी, मोती, मोती, हिरे) यावर दावा करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
  • ओळखपत्र आणि निवासी पत्ता पुरावा (उदा. आधार कार्ड, निवडणूक कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट इ.)
  • पोलीस N.C. / F.I.R. किंवा
  • कॅश मेमो / संबंधित वस्तूंचे बिल



हेही वाचा

महाशिवरात्रीनिमित्त बेस्टची विशेष बस सेवा, 'या' मार्गांवर धावणार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा