Advertisement

नाल्यांमध्ये कचरा टाकणाऱ्यांकडून दंड आकारण्यात येण्याची शक्यता

प्रस्तावावर सध्या चर्चा सुरू आहे, असे एका वरिष्ठ नागरी अधिकाऱ्याने सांगितले.

नाल्यांमध्ये कचरा टाकणाऱ्यांकडून दंड आकारण्यात येण्याची शक्यता
SHARES

वांद्रेनंतर मुंबईतल्या छोट्या नाल्यांवरही जाळी बसवण्याची योजना बीएमसी आखत आहे. नाल्यात कचरा टाकणाऱ्या लोकांवर दंड आकारण्याचा विचारही प्रशासकीय संस्था करत आहे. या प्रस्तावावर सध्या चर्चा सुरू आहे, असे एका वरिष्ठ नागरी अधिकाऱ्याने सांगितले.

बीएमसीने 3 ते 15 डिसेंबर दरम्यान शहरातील  सफाई मोहिमेद्वारे 1,042 मेट्रिक टन भंगार आणि 139 मेट्रिक टन कचरा हटवला. प्रत्येक शनिवारी प्रत्येक प्रशासकीय झोनच्या एका प्रभागात ही मोहीम हाती घेतली जाते. 

मोहिमेदरम्यान,  पथकाला थर्माकोल, प्लास्टिक पिशव्या, फर्निचर, रबर, रॅपर आदी कचरा नाल्यात सापडला. ज्यामुळे नाले तुंबतात. यासाठीच नाल्यांमध्ये कचरा टाकू नये म्हणून प्रशासकीय संस्था वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे.

"आम्ही नियमितपणे नाल्यांचे गाळ काढण्याचे काम केले आहे. अलीकडेच वांद्रे पश्चिम येथील पी अँड टी कॉलनी येथील एका नाल्यावर प्रायोगिक तत्त्वावर 10 फुटांपर्यंत जाळी बसवण्यात आली आहे. लहान नाल्यांनाही कव्हर करता येईल का ते आम्ही तपासू. पण आता आम्ही लोक नाल्यांमध्ये कचरा टाकू नयेत म्हणून दंड लागू करण्याबाबत चर्चा करत आहोत,” एका वरिष्ठ नागरी अधिकाऱ्याने सांगितले.

बीएमसीने याआधी नाल्यांवर डस्टबिन बसवणे, त्यांना जाळ्यांनी झाकणे, मोहिमेद्वारे जनजागृती करणे आणि नाल्यांवर लक्ष ठेवण्यासाठी क्लीन-अप मार्शल नियुक्त करणे अशा अनेक उपाययोजना केल्या आहेत. प्लॅस्टिक कॅरीबॅगमुळे नाले तुंबणे हे 2005 मधील 26/7 महापूराचे एक प्रमुख कारण होते, ज्यामध्ये एक हजाराहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.



हेही वाचा

रस्त्यांच्या कामांची माहिती आता ऑनलाइन मिळणार!

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा