Advertisement

भेसळ रोखण्यासाठी बीएमसीचे कडक पाऊल

1 सप्टेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान तपासणी केली जाणार आहे.

भेसळ रोखण्यासाठी बीएमसीचे कडक पाऊल
SHARES

गणेशोत्वस आणि नवरात्रीचा उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे अनेकांनी या उत्सवाची तयारी केली आहे. अशातच सणासुदीच्या कालावधीत मुंबई महापालिकेकडून सार्वजनिक आरोग्य अधिकारी तसेच स्वच्छता निरीक्षकांना महत्वाचे आदेश देण्यात आले आहेत.

येत्या सण-उत्सवांच्या कालावधीत मिठाई सेवनाने विषबाधेचे प्रकार घडू नये म्हणून खाद्य पदार्थ विकणाऱ्या आस्थापनांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने केले आहे.

तसेच आगामी काळात वैद्यकीय आरोग्य अधिकारी, स्वच्छता निरीक्षकांनी त्यांच्या आपापल्या कार्यकक्षेतील मावा, मिठाईची दुकाने, मावा साठवणूक शीतगृह यांची कसून तपासणी करावी, असंही सांगण्यात आलं आहे.

मुंबई महानगरपालिका (BMC) आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य खाते सण-उत्सवांच्या कालावधीत विशेष खबरदारी घेत असते. त्याच अनुषंगाने मुंबई शहरात मावा-मिठाई विकणाऱ्या आस्थापनांची तपासणी करण्यात येणार आहे.

या पार्श्वभूमीवर नागरिकांना विषबाधा (Food Poisoning) होऊ नये म्हणून महानगरपालिकेचे सर्व वैद्यकीय आरोग्य अधिकारी, स्वच्छता निरीक्षकांना १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२३ या काळात गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी व नाताळ इत्यादी सणांच्या पार्श्वभूमीवर विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी दिली आहे.

सणासुदीच्या कालावधीत अन्न विषबाधासारखी कोणतीही घटना घडणार नाही यासाठी वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनी आपआपल्या विभागांत मिठाई विषबाधेबाबतची भित्तीपत्रकांचे वाटप करावे व जनजागृती करावी, असेही निर्देशित करण्यात आले आहे.

त्याचबरोबर मिठाईचा रंग बदलत असल्यास अथवा उग्र वास येत असल्यास किंवा बुरशी दिसल्यास अशा मिठाई पदार्थांचे सेवन करू नये व असे पदार्थ आढळल्यास मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य खात्याच्या विभागीय वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्या निदर्शनास आणून द्यावी, असंही आवाहन नागरिकांना करण्यात आलंय.



हेही वाचा

मुंबईच्या वेशीवरील ५ नाक्यावरचा टोल वाढला

ब्रेडच्या किमतीत वाढ, जाणून घ्या नवे दर

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा