‘एटीएम’मधील पैशांच्या तुटवड्याने बँक ग्राहक हैराण

  मुंबई  -  

  सायबर हल्ल्याच्या भितीने बहुतेक बँकांनी आपापल्या ‘एटीएम’ची ऑपरेटींग सिस्टीम अपग्रेड करून घेण्यास सुरूवात केलीय. यामुळे शहरातील ठिकठिकाणचे ‘एटीएम’ बंद असल्याचे आढळून येत आहेत. मागील काही दिवसांपासून शहरातील सर्वच ‘एटीएम’मध्ये पैशांचा तुटवडा जाणवत असतानाच पुन्हा अॉपॅरेटींग सिस्टीम अपग्रेड करण्याच्या नावाखाली ‘एटीएम’ बंद असल्याने बँक ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय.

  देशातील बहुतांश ‘एटीएम’मधील ऑपरेटींग सिस्टीम कालबाह्य झाल्याने या ‘एटीएम’वर केव्हाही सायबर हल्ला होऊ शकतो, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवलीय. भारतातील तब्बल 70 टक्के ‘एटीएम’ हे ‘विडोंज एक्सपी’ या अॉपरेटींग सिस्टीमवर चालतात. मात्र ‘वॉन्नाक्राय’ या रॅनसमवेअर व्हायरसने ‘विडोंज एक्सपी’ या अॉपरेटींग सिस्टीमला लक्ष्य केल्याने दीडशेपेक्षा जास्त देशांतील दोन लाखांहून अधिक कम्प्युटर्सवर परिणाम झालाय.

  देशातील ‘एटीएम’ना असलेला संभाव्य धोका लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना आपापल्या ‘एटीएम’मधील ऑपरेटींग सिस्टीम अपडेट करण्याचे निर्देश दिलेत. त्यानुसार सर्व बँकांनी ‘एटीएम’मधील ऑपरेटींग सिस्टीम अपडेट करण्याचे काम हाती घेतल्याने त्याचा फटका पुढील काही दिवस बँक ग्राहकांना सहन करावा लागण्याची चिन्हे आहेत.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.