SHARE

मुंबई महापालिका मुख्यालयातील नागरी सुविधा केंद्राच्या प्रवेशद्वारासमोरच जलवाहिनी फुटलेली असून यामध्ये हजारो लिटर पाणी वाहून गेले. संध्याकाळी सव्वा पाचच्या सुमारास फुटलेल्या या जलवाहिनीतून रात्रीपर्यंत पाणी वाहून जात होते.

महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वार क्रमांक १ समोर तसेच भुयारी मार्गाशेजारी असलेल्या बस स्थानकाच्या खालून सोमवारी संध्याकाळी जलवाहिनीला मोठ्याप्रमाणात गळती लागली. यातून मोठ्याप्रमाणात पाणी वाहून गेले असून पदपथ आणि रस्ता यांच्या सुरक्षा भिंतीच्या खालूनच पाणी वाहून जात होते. या पदपथाखालून या भागाला पाणीपुरवठा करणारी ४ इंच व्यासाची मुख्य जलवाहिनी जात असून ती जलवाहिनी जीर्ण होऊन त्यातून ही गळती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महापालिकेच्या ए विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याठिकाणी जलवाहिनीला गळती लागल्याचे म्हटले आहे. याबाबतची तक्रार आली असून त्याप्रमाणे जलअभियंता विभागाला सूचना करण्यात आली. त्याप्रमाणे रात्री याठिकाणचे खोदकाम करून गळती शोधून जलवाहिनी दुरुस्त करण्याचे काम हाती घेतले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.हेही वाचा - 

जलवाहिनीलगतच्या झोपड्यांवर आता कारवाई होणार!

अंबोलीच्या रहिवाशांनो आता झोपा निवांत, महापालिकेने बदलली पाण्याची वेळ !
संबंधित विषय
ताज्या बातम्या