Advertisement

मुलगी सोसायटीत कुत्रा घेऊन गेल्यानं जोडप्याला घरं खाली करण्याची नोटीस

जोडप्याच्या मुलीनं म्हटलं की, करारात पाहुण्यांच्याा पाळीव प्राण्यांबद्दल काहीही नमूद केलेलं नाही.

मुलगी सोसायटीत कुत्रा घेऊन गेल्यानं जोडप्याला घरं खाली करण्याची नोटीस
SHARES

वर्सोवा इथं एका फ्लॅटच्या भाडेकरूच्या घरी त्यांच्या मुलीनं कुत्र्यासह भेट दिल्यानं सोसायटीनं नोटीस बजावली आहे. सोसायटीमध्ये पाळीव प्राणी पाळण्यास मनाई आहे. त्यामुळे मालकांना नोटीस बजावण्यात आली. पण जोडप्याच्या मुलीनं म्हटलं की, करारात पाहुण्यांच्याा पाळीव प्राण्यांबद्दल काहीही नमूद केलेलं नाही.

मुंबई मिररच्या वृत्तानुसार, झरीना आणि अब्दुल रझाक फ्रूटवाला हे १५ दिवसांपूर्वी वर्सोवा इथल्या एव्हरेस्ट सोसायटीतील फ्लॅटमध्ये गेले. अभिनेत्री आणि छायाचित्रकार असलेली त्यांची मुलगी मिनाझ म्हणाली की, तिचे आईवडील २० ऑक्टोबरला शिफ्ट झाले आणि त्यांच्याकडे कोणताही पाळीव प्राणी नाही.

"मी माझा कुत्रा घेऊन त्यांच्या घरी जायची. जेव्हा मी सोसायटीत गेले तेव्हा मालकानं आक्षेप घेतला की पाळीव प्राण्यांविरूद्ध काही नियम आहेत. पण, करारामध्ये भेट देणाऱ्या पाळीव प्राण्यांचा उल्लेख नव्हता. आता मालक माझ्या आई-वडिलांना फ्लॅट रिकामे करण्यास सांगत आहे. जर मी काही कामानिमित्त कुत्र्यांना सोबत घेऊन गेले तर काय अडचण आहे?

दरम्यान,  प्राण्यांना सोसायटीत प्रवेश नाही हा नियम आधीपासूनच स्पष्ट केला होता, असा दावा जमीनदार मुश्ताक हेतावकर यांनी केला.

सोशल मीडियावर या विषयावर लिहल्यावर समोर आलं की, या समस्येचा सामना करणारी ती एकमेव नव्हती. असं दिसून आलं की, मुंबईतील बर्‍याच जमीनदार आणि गृहनिर्माण संस्थांमध्ये लोकं पाळीव प्राणी पाळतात. परंतु, पाळीव प्राणी ठेवण्यासंबंधी महाराष्ट्र सोसायटी वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष रमेश प्रभू म्हणाले की, पाळीव प्राणी पाळण्याच्या बाजूनं कोर्टाचे अनेक आदेश आहेत.हेही वाचा

दुर्घटनांमध्ये बचावासाठी बीएमसी देणार नागरिकांना विशेष प्रशिक्षण

वरळीतील पालिकेच्या शाळेनं सर्वोत्तम शाळा राष्ट्रीय सर्वेक्षणात पटकावला देशात ४था क्रमांक

Read this story in English
संबंधित विषय