दिवाळीत मुंबईत होणार 'डबाबंदी'

दिवाळीनिमित्त मुंबईतील डबेवाले चार दिवस घेणार दिवाळी सुट्टी

SHARE

मुंबईकरांना ऊन-पावसात देखील वेळेत डबा पोहोचविणारे मुंबईचे डबेवाले यंदाच्या दिवाळीत ४ दिवसांची दिवाळीची सुट्टी घेणार आहेत. दिवाळी असल्यामुळे शाळांना दिवाळीत सुट्टी असते. तसेच अनेक कार्यालयीन कर्मचारीही दिवाळीत सुट्टीवर जात असल्याने डबेवाल्यांवर फारसा ताण नसतो. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत 'ब्रेक' घेण्याचं डबेवाल्यांनी ठरवलं आहे.


ग्राहकांना केली विनंती

यासाठी डबेवाल्यांच्या 'मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळा'च्या वतीने ग्राहकांना विनंतीही करण्यात आली आहे. दिवाळीच्या सणानिमित्त मुकादम आणि कामगार ४ दिवस रजा घेणार आहेत. म्हणून जेवण डबे वाहतूक बुधवार १८ ऑक्टोबर ते शनिवार २१ ऑक्टोबर पर्यंत बंद राहणार आहे. सोमवार २३ ऑक्टोबर पासून नेहमीप्रमाणे जेवण डबे वाहतूक सुरू होईल.


कृपया पगार कापू नका

परंतु या दिवसाच्या रजेचा पगार ग्राहकांनी कृपया कापून घेऊ नये. तसेच दिवाळी बोनस म्हणून एक जादा पगार दिवाळी अगोदर आक्टोबर महिन्यातील पगाराबरोबर द्यावा, अशी विनंती देखील करण्यात आल्याची माहिती मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळाचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी दिली.डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

संबंधित विषय
ताज्या बातम्या