Advertisement

मुंबई डबेवाला असोसिएशन डबेवाल्यांच्या मदतीला


मुंबई डबेवाला असोसिएशन डबेवाल्यांच्या मदतीला
SHARES

मुंबईच्या कानाकोपऱ्यासह उपनगरात मुंबईचे डबेवाले जेवण पोहोचवतात. कोरोना व्हायरसमुळं मुंबईसह राज्यभरात लॉकडाउन करण्यात आलं आहे. त्यामुळं सर्व वाहतूक बंद असून नागरिकांनाही घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. मोट-मोठ कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांनाही सुट्टी दिली असून, काही जण वर्क फ्रॉम होम करत आहेत. त्यामुळं ऑफिस बंद असल्यानं डबेवाल्यांनी १९ मार्चला काम केले २० मार्च पासून काम बंद केले.

डबेवाल्यांनी सेवा बंद केल्यानं बरेचसे डबेवाले १९ मार्चला रात्री आणि २० मार्चला आपल्या गावी निघुन गेलेत. पण काही डबेवाले मात्र मुंबईत राहीले आहेत. लॉकडाउन असल्यामुळं अनेक डबेवाले जिथं आहे, तिथंच थांबले आहेत. लॉकडाउनमधिल दिवस कसे तरी काढले पण आता जवळील रेशन ही संपले आणि मार्च महिन्याचा पगार ही घेतां आला नाही. यामुळे काही डबेवाल्यांच्या कुटुंबाची अडचण निर्माण झाली होती. 

ही अडचण लक्षात घेत, 'मुंबई डबेवाला असोशिएन'नं मदतीचा हात पुढे केला आहे. समाजसेवक सत्यसाईबाबा भक्त व मुंबई डबेवाला असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमानानं गरजवंत डबेवाला कुटुंबाला प्रत्येकी १५०० रूपयांचे रेशन सामान मोफत दिलं जातं आहे. ५ डबेवाल्यांचा ग्रुप बनवून डबेवाल्यांनी आपल्या विभागातील दुकानात सामान विकत घेतात त्या दुकानाचे बिल दुकानदाराला त्याच्या खात्यात तात्काळ ट्रान्सफर केले जात आहे.



हेही वाचा -

तर, मुंबई महानगरातील लाॅकडाऊन सुरूच राहणार, मुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव तयार?

शरद पवारांच्या सांगण्यावरून वाधवान कुटुंबाला पत्र? किरीट सोमय्यांचा प्रश्न



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा