Advertisement

शरद पवारांच्या सांगण्यावरून वाधवान कुटुंबाला पत्र? किरीट सोमय्यांचा प्रश्न

भाजपचे नेते किरीट सोमय्या (bjp leader kirit somaiya) यांनी या प्रकरणी थेट शरद पवार यांच्यावरच निशाणा साधला आहे.

शरद पवारांच्या सांगण्यावरून वाधवान कुटुंबाला पत्र? किरीट सोमय्यांचा प्रश्न
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि वाधवान कुटुंबियांचे (wadhawan brother) घरगुती संबंध जगजाहीर आहेत. त्यामुळे ऐन संचारबंदीच्या काळात कुणाच्या आदेशावरून वाधवान कुटुंबाला महाबळेश्वरला जाण्यासाठी परवानगीचं खास पत्र देण्यात आलं, हे सांगण्याची आवश्यकता नाही, असं म्हणत भाजपचे नेते किरीट सोमय्या (bjp leader kirit somaiya) यांनी या प्रकरणी थेट शरद पवार यांच्यावरच निशाणा साधला आहे. 

म्हणून मिळालं पत्र

वाधवा प्रकरणात प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत किरीट सोमय्या यांनी हे आरोप केले आहेत. येस बँक आणि डीएचएफएल घोटाळा प्रकरणात सध्या जामिनावर असलेल्या वाधवा बंधू यांना संचारबंदीच्या काळातही महाबळेश्वरला (mahabaleshwar) जाण्याची परवानगी देणारे गृविभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता (principal seceratery amitabh gupta) यांना सध्या सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. असं असलं, तरी शरद पवारांच्या (ncp chief sharad pawar) पाठिंब्याशिवाय वाधवान कुटुंबाला गृह सचिवांकडून परवानगी पत्र मिळणं अशक्य असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. 

दरम्यान सोमय्या यांनी मुलुंड पोलीस ठाण्यात अमिताभ गुप्ता यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यासंबंधी तक्रार केलीआहे.

हेही वाचा- अमिताभ गुप्तांचा कर्ता करविता कोण? भाजपचा गृहमंत्र्यांना सवाल

काय आहे प्रकरण?

महाराष्ट्रात संचारबंदी असताना व कुणालाही घराबाहेर पडण्याची परवानगी नसताना दिवाण हाऊसिंग फाययान्स लिमिटेडचे (डीएचएफएल) संस्थापक वाधवान बंधू आपलं कुटुंब व नोकरचाकरांसह खंडाळ्याहून महाबळेश्वरला गेले होते. तिथं त्यांना पकडण्यात आल्यानंतर हे सर्व प्रकरण उजेडात आलं. गृहविभागाचे विशेष सचिव अमिताभ गुप्ता यांनी दिलेल्या पत्रात वाधवान बंधूंचा उल्लेख 'माझे फॅमिली फ्रेंड' असा करत त्यांच्या ५ गाड्यांसाठी विशेष पास इश्यू केला होता. या सर्वांना कौंटुबिक अत्यावश्यक कारणासाठी खंडाळा येथून महाबळेश्वरला जायचं आहे, असंही पासवर नमूद करण्यात आलं होतं. हे प्रकरण बाहेर आल्यावर गृहमंत्र्यांनी गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतला.

गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

गृहमंत्रालय हे राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्याकडे असल्याने भाजपकडून शरद पवार यांच्यावर आरोप करण्यात येत आहे. सरकार हे काय अमिताभ गुप्ता यांच्या मालकीचं आहे का? एका बाजूला संचारबंदीत जनता सहन करत असताना वाधवान कुटुंबाला फॅमिली फ्रेंड म्हणून महाबळेश्वरला जाण्याची परवानगी दिली जाते. हा निर्णय नक्कीच गृहविभागाचे विशेष सचिव अमिताभ गुप्ता यांचा असू शकत नाही. हे आदेश गृहमंत्र्यांचे होते का? सरकारमधील इतर कुणाचे याचा खुलासा व्हायलाच पाहिजे. तसंच नैतिकतेच्या आधारे गृहमंत्र्यांनी (home minister anil deshmukh) तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (bjp mla pravin darekar) यांनी केली आहे. 

हेही वाचा- संचारबंदीतही वाधवान कुटुंबातील २३ जण मुंबईहून गेले महाबळेश्वरला, प्रकरणाची होणार चौकशी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा