Advertisement

अमिताभ गुप्तांचा कर्ता करविता कोण? भाजपचा गृहमंत्र्यांना सवाल

अमिताभ गुप्तांचा (Special home secretary Amitabh gupta) कर्ता करविता कोण? याचा खुलासा करण्याची मागणी करत भाजपने आता गृहनिर्माणमंत्री अनिल देशमुख यांना लक्ष्य केलं आहे.

अमिताभ गुप्तांचा कर्ता करविता कोण? भाजपचा गृहमंत्र्यांना सवाल
SHARES

राज्यात संचारबंदी (lockdown) असतानाही दिवाण हाऊसिंग फाययान्स लिमिटेडचे (DHFL) संस्थापक वाधवान बंधू (wadhwan brothers) यांना विशेष पत्राद्वारे मुंबईहून महाबळेश्वरला जाण्याची परवानगी देणारे गृहविभागाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. परंतु गुप्ता यांच्यासारखा मोठा अधिकारी परस्पर असा निर्णय घेणार नाही. महाविकास आघाडी सरकारमधील एखाद्या बड्या नेत्याच्या आदेशावरूनच हे पत्र त्यांनी दिलं असणार. त्यामुळे अमिताभ गुप्तांचा (Special home secretary Amitabh gupta) कर्ता करविता कोण? याचा खुलासा करण्याची मागणी करत भाजपने आता गृहनिर्माणमंत्री अनिल देशमुख यांना लक्ष्य केलं आहे.  

वाधवान प्रकरणात महाराष्ट्र सरकारने गृहविभागाचे विशेष सचिव अमिताभ गुप्ता यांना एका रात्रीत घरी बसवलं. पण प्रश्न असा उपस्थित होतो की सरकारमधील एखाद्या मोठ्या नेत्याने सांगितल्याशिवाय अमिताभ गुप्ता यांच्यासारखा एक जबाबदार अधिकारी अशा प्रकारचा निर्णय स्वत: घेऊच शकत नाहीत. अमिताभ गुप्ता यांना घरी बसवून सरकारला स्वत:ची जबाबदारी टाळता येणार नाही. त्यामुळे वाधवान कुटुंबाला महाबळेश्वरला जाण्याची परवानगी देण्यासाठी अमिताभ गुप्ता यांना कुठल्या नेत्याने आदेश दिले, हे महाराष्ट्र सरकारने जनतेला सांगितलं पाहिजे, अशी मागणी भाजपचे नेते आमदार राम कदम (bjp mla ram kadam) यांनी केली.  

सरकार हे काय अमिताभ गुप्ता यांच्या मालकीचं आहे का? एका बाजूला संचारबंदीत जनता सहन करत असताना वाधवान कुटुंबाला फॅमिली फ्रेंड म्हणून महाबळेश्वरला जाण्याची परवानगी दिली जाते. हा निर्णय नक्कीच गृहविभागाचे विशेष सचिव अमिताभ गुप्ता यांचा असू शकत नाही. हे आदेश गृहमंत्र्यांचे होते का? सरकारमधील इतर कुणाचे याचा खुलासा व्हायलाच पाहिजे. तसंच नैतिकतेच्या आधारे गृहमंत्र्यांनी (home minister anil deshmukh) तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, असं विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (bjp mla pravin darekar) म्हणाले.

तर, भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (bjp leader kirit somaiya) यांनी मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवत अमिताभ गुप्ता यांच्यावर एफआयआर नोंदवून या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. येस बँक आणि डीएचएफएफ घोटाळ्यातील आरोपी दिवाण बंधू सध्या जामिनावर तुरूंगाबाहेर आहेत. त्यांना महाराष्ट्र सरकार व्हिव्हिआयपी ट्रिटमेंट देते. विशेष गृहसचिव त्यांना व्हिआयपी पास देतात आणि पूर्ण सुरक्षेत ते मुंबईहून महाबळेश्वरला जातात. या सर्व प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे अशी विनंती मी महाराष्ट्राच्या राज्यपालांना केल्याचं सोमय्या यांनी सांगितलं.  

काय आहे प्रकरण?

महाराष्ट्रात संचारबंदी असताना व कुणालाही घराबाहेर पडण्याची परवानगी नसताना दिवाण हाऊसिंग फाययान्स लिमिटेडचे (डीएचएफएल) संस्थापक वाधवान बंधू आपलं कुटुंब व नोकरचाकरांसह खंडाळ्याहून महाबळेश्वरला गेले होते. तिथं त्यांना पकडण्यात आल्यानंतर हे सर्व प्रकरण उजेडात आलं. गृहविभागाचे विशेष सचिव अमिताभ गुप्ता यांनी दिलेल्या पत्रात वाधवान बंधूंचा उल्लेख 'माझे फॅमिली फ्रेंड' असा करत त्यांच्या ५ गाड्यांसाठी विशेष पास इश्यू केला होता. या सर्वांना कौंटुबिक अत्यावश्यक कारणासाठी खंडाळा येथून महाबळेश्वरला जायचं आहे, असंही पासवर नमूद करण्यात आलं होतं. हे प्रकरण बाहेर आल्यावर गृहमंत्र्यांनी गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतला.


हेही वाचा -

प्रधान सचिव अमिताभ गुप्ता सक्तीच्या रजेवर

संचारबंदीतही वाधवान कुटुंबातील २३ जण मुंबईहून गेले महाबळेश्वरला, प्रकरणाची होणार चौकशी





संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा