Advertisement

तर, मुंबई महानगरातील लाॅकडाऊन सुरूच राहणार, मुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव तयार?

मुंबई महानगर (MMR) परिसरात लाॅकडाऊन कायम ठेवण्याची विनंती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केंद्र सरकारला करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

तर, मुंबई महानगरातील लाॅकडाऊन सुरूच राहणार, मुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव तयार?
SHARES

कोरोना व्हायरसचा (coronavirus) प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशपातळीवर लागू असलेला लाॅकडाऊन (lockdown) संपायला अवघे काही दिवसच उरले आहेत. हा लाॅकडाऊन वाढणार की नाही, याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत माहिती नसताना मुंबई महानगर (MMR) परिसरात लाॅकडाऊन कायम ठेवण्याची विनंती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केंद्र सरकारला करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. 

मुंबईत सर्वाधिक रुग्ण

राज्यात कोरोनाच्या २२९ नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १३६४ वर जाऊन पोहोचली आहे. यातील १२५ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं असून उर्वरीत ११४२ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (health minister rajesh tope) यांनी ट्विटरवरून दिली आहे. त्यातही मुंबईत आतापर्यंत कोरोनाचे एकूण ७७५ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ५४ जणांचा मृत्यू झाला असून ६५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

हेही वाचा- Exclusive: महाराष्ट्र सरकार शाळांना क्वारंटाईन सेंटर बनवण्याच्या विचारात

दाटीवाटीची वस्ती

राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबई महानगरातीलच असल्याचं दिसून येत आहे. मुंबई शहरासोबत, मुंबई उपनगर, ठाणे, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, पालघर, नवी मुंबई, रायगड पर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढतच चालला आहे. हे सर्वच ठिकाणं दाटीवाटीची असल्याने येथील रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

पंतप्रधानांसोबत चर्चा

त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी लागू केलेला लाॅकडाऊन १४ एप्रिल रोजी संपणार आहे. त्यामुळे सद्याची परिस्थिती पाहता हा लाॅकडाऊन आणखी वाढवण्यात यावा, अशी विनंती बहुतेक राज्याचे मुख्यमंत्री करताना दिसत आहेत. अशीच विनंती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून देखील हाेण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ एप्रिल रोजी पुन्हा एकदा सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ काॅन्फरन्सिगद्वारे संवाद साधणार आहेत. यावेळी लाॅकडाऊन वाढवायचा की नाही याबाबत ते सर्व मुख्यमंत्र्यांची मतं विचारणार आहेत. 

हेही वाचा- अमिताभ गुप्तांचा कर्ता करविता कोण? भाजपचा गृहमंत्र्यांना सवाल

प्रस्ताव सादर करणार

यावेळी देशात लाॅकडाऊन उठवण्याचा निर्णय झाल्यास मुंबई महानगर परिसरात पुढील १० ते १४ दिवस लाॅकडाऊन सुरूच राहावा, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठकरे यांच्याकडून केली जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील प्रस्ताव देखील मुख्यमंत्र्यांनी तयार केल्याची सूत्रांची माहिती आहे. मुंबई महानगर परिसरात दक्षिण मुंबई ते एका बाजूला पालघर ते दुसऱ्या बाजूला रायगड पर्यंतचा संपूर्ण परिसर येतो.  


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा