Advertisement

लंडनच्या छोट्या राजपुत्राला डबेवाल्यांकडून भेट, पाठवणार वाळे आणि कमरपट्टा

ब्रिटनच्या राजघराण्याशी जिव्हाळ्याचं नात असणारे मुंबईचे डबेवालेदेखील छोट्या राजपुत्राला आशीर्वाद देण्यासाठी सज्ज झालेत. डबेवाल्यांकडून लवकरच या छोट्या राजपुत्राला चांदीचे वाळे, पायातील तोडे आणि कमरपट्टा अशी भेट पाठवण्यात येणार आहे.

लंडनच्या छोट्या राजपुत्राला डबेवाल्यांकडून भेट, पाठवणार वाळे आणि कमरपट्टा
SHARES

ब्रिटनचा राजकुमार हॅरी आणि हॉलिवूड अभिनेत्री मेगन मार्कल यांच्या घरी सोमवारी नव्या पाहुण्याचं आगमन झालं. जगभरात या पाहुण्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना ब्रिटनच्या राजघराण्याशी जिव्हाळ्याचं नात असणारे मुंबईचे डबेवालेदेखील छोट्या राजपुत्राला आशीर्वाद देण्यासाठी सज्ज झालेत. डबेवाल्यांकडून लवकरच या छोट्या राजपुत्राला चांदीचे वाळे, पायातील तोडे आणि कमरपट्टा अशी भेट पाठवण्यात येणार आहे.


राजपुत्राला आशीर्वाद

याबाबत बोलताना मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर म्हणाले की, ' २००३ साली भारत दौऱ्यावर आलेले प्रिन्स चार्ल्स आम्हाला मुंबईला येऊन भेटून गेल्यापासून आमच्या कामाला जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळाली. ते आता आजोबा झाले असून राजघराण्याला नवा राजपुत्र मिळाला आहे. या बाळाच्या दीर्घायुष्यासाठी आम्ही सर्वच जण प्रार्थना करत आहोत. छोट्या राजपुत्राला आशीर्वाद म्हणून आम्ही आमच्या ऐपतीनुसार हातातील वाळे, पायातील तोडे, कमरपट्टा अशा भेटवस्तू आम्ही पाठवणार आहोत.   

 

लग्नालाही हजेरी

प्रिन्स चार्ल्स यांनी राजकुमार हॅरीच्या लग्नाला येण्याचं निमंत्रण डबेवाल्यांना दिलं होतं. त्यानुसार लंडनमध्ये झालेल्या हॅरी आणि मेगनच्या लग्न सोहळ्यात २ डबेवाले हजर होते. या लग्नासाठी डबेवाल्यांनी हॅरी आणि मेगन यांना सलवार-कुर्ता फेटा तसंच पैठणी साडीचोळी असा मराठमोळा आहेर भेट म्हणून दिला होता. 



हेही वाचा-

मुंबईचे डबेवाले जाणार ६ दिवस सुट्टीवर!

डबेवाल्यांकडून प्रिन्स हॅरीला मराठमोळा आहेर



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा