Advertisement

'मुंबई आय' प्रकल्प लटकला, इच्छुक कंपन्यांनी यामुळे फिरवली पाठ

एकाही कंपनीनं प्रतिसाद न दिल्यानं निविदा प्रक्रियेस आणखी १५ दिवसांची मुदत वाढ देण्यात आली आहे. त्यामुळे या १५ दिवसात तरी कोणी कंपनी निविदा सादर करते का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

'मुंबई आय' प्रकल्प लटकला, इच्छुक कंपन्यांनी यामुळे फिरवली पाठ
SHARES

लंडन आयच्या धर्तीवर वांद्रेत मुंबई आय हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठाकरे सरकारनं हाती घेतला आहे. परंतु नियोजित जागी पुरेशी जागा नसल्यानं इच्छुक कंपन्यांनी याकडे पाठ फिरवल्याचं चित्र आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी निविदा सादर करण्याची मुदत २० मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे

आठशे फूट उंचीवरून पर्यटकांना मुंबईचे दर्शन घडावे यासाठी लंडन आयच्या धर्तीवर वांद्रेत एमएमआरडीएच्या माध्यमातून मुंबई आय प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक कंपन्यांना निविदा सादर करायच्या होत्या. याची अंतिम तारीख ६ मार्च होती. मात्र एकाही कंपनीनं प्रतिसाद न दिल्यानं निविदा प्रक्रियेस आणखी १५ दिवसांची मुदत वाढ देण्यात आली आहे

मुंबई आय उभारण्याची जबाबदारी एमएमआरडीएकडे आहे. या प्रकल्पाबाबत सुचना आणि हरकती जाणून घेण्यासाठी इच्छुक कंपन्यांची १२ फेब्रुवारीला विशेष बैठक झाली. या बैठकित ८ कंपन्यांमधून २० प्रतिनिधी सहभागी होते. यात लार्सन अँड टुब्रो, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, एस्सेल वर्ल्ड, प्रकाश अम्युजमेंट्स, हितेन सेठी अँड असोसिएट्स आदी कंपन्यांचा समावेश होता. या कंपन्यांच्या प्रतिनिधींचे म्हणणे होते की, या प्रकल्पाला आणखी जागा हवी आहे.  

मुंबई आय प्रकल्पासाठी १ एकरहून अधिक जागा लागण्याची शक्यता आहे. मोक्याची जागा असल्यानं भविष्यात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो हे देखील बैठकीत लक्षात आणून दिले गेले. यासोबतच पार्किंगची व्यवस्था, बांधकाम कालावधी, अपेक्षित निधी आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.     हेही वाचा

उच्च वर्गीयांची 'मंदी'तही चांदी, मुंबईत विकला ६६ कोटींचा एक फ्लॅट

शिवाजी पार्कचा कायापालट होणार, जाॅगिंग, सायकल ट्रॅकसह आधुनिक फुटबाॅल ग्राऊंड होणार

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा