Advertisement

शिवाजी पार्कचा कायापालट होणार, जाॅगिंग, सायकल ट्रॅकसह आधुनिक फुटबाॅल ग्राऊंड होणार

मुंबई महापालिकेने शिवाजी पार्कच्या सुशोभीकरणाचा आराखडा तयार केला असून या आराखड्यानुसार विविध खेळांसाठी मैदानाचा वापर करणाऱ्या खेळाडूंना चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

शिवाजी पार्कचा कायापालट होणार, जाॅगिंग, सायकल ट्रॅकसह आधुनिक फुटबाॅल ग्राऊंड होणार
SHARES

दादर पश्चिमेकडील प्रसिद्ध शिवाजी पार्कचा (Dadar shivaji park ground) लवकरच कायापालट होणार आहे. मुंबई महापालिकेने शिवाजी पार्कच्या सुशोभीकरणाचा आराखडा तयार केला असून या आराखड्यानुसार विविध खेळांसाठी मैदानाचा वापर करणाऱ्या खेळाडूंना चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.  

शिवाजी पार्क हे मैदान प्रामुख्याने क्रिकेटसाठी (shivaji park cricket ground) प्रसिद्ध आहे. इथं लिटिल मास्टर सुनील गावस्कर, अजित वाडेकर, सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, प्रविण आमरे, संजय मांजरेकर यांच्यासारखे असंख्य खेळाडू घडलेत. तसंच या मैदानावर कबड्डी, खो-खो, मल्लखांब इ. खेळप्रकारही खेळले जातात.

हेही वाचा-शिवाजी पार्क नजीकच्या बस स्टॉपवर व्हर्टीकल गार्डन

त्याच जोडीने महापालिका (bmc redevelopment plan) आता शिवाजी पार्कमध्ये जॉगिंग, सायकल ट्रॅक, फुटबॉल, बास्केटबाॅल ग्राऊंड, स्केटिंग रिंक, कबड्डी-खो-खो कोर्ट उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी महापालिकेकडून ५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

महापालिकेच्या जी-उत्तर विभागाचे (bmc g north) अतिरिक्त आयुक्त किरण दिघावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ एकर जागेवर पसरलेल्या शिवाजी पार्क मैदानात क्रिकेटसाठी ८ खेळपट्ट्या आहेत. नवीन आराखड्यानुसार क्रिकेटसाठी एकच स्वतंत्र खेळपट्टी तयार करण्यात येईल. पार्कात बेंगाॅल क्लक आणि आदर्श फुटबाॅल क्लब इ. क्लब आहेत. सध्या पार्काच्या उत्तरेकडील बाजू फुटबाॅल खेळण्यासाठी उपलब्ध आहे. आराखड्यानुसार जास्त जागा उपलब्ध झाल्यावर फुटबॉल, बास्केटबाॅलसाठी वेगळं मैदान तयार करता येईल. 

पार्कातील उरलेली ३१ टक्के जागा खुली ठेवण्यात येईल. या जागेत सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमाचे आयोजन होऊ शकेल. यामध्ये २ लाख लोकं बसतील, एवढी जागा उपलब्ध होईल. 

शिवाजी पार्कमध्ये धूळ अधिक असल्याने, त्यावर वेळोवेळी पाण्याचा शिडकावा करण्यासाठी महापालिका या ठिकाणी स्प्रिंगलर बसविणार आहे. तसंच लॉनवर पाणी मारण्यासाठी महापालिकेला १७ दशलक्ष लीटर पाण्याची गरज पडणार आहे. त्यावर दरवर्षी महापालिकेला २४ लाख रुपये खर्च येणार आहे.

हेही वाचा- पदपथांवरील झाडांसाठी पोरस काँक्रिट, पालिकेची अनोखी कल्पना


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा