Advertisement

पदपथांवरील झाडांसाठी पोरस काँक्रिट, पालिकेची अनोखी कल्पना

पदपथांवरील या झाडांसाठी आता मुंबई महापालिकेने अनोखा उपाय अवलंबला आहे. या झाडांसाठी पोरस काँक्रिटची नवीन संकल्पना कार्यान्वित केली जात आहे.

पदपथांवरील झाडांसाठी पोरस काँक्रिट, पालिकेची अनोखी कल्पना
SHARES

मुंबईतील अनेक पदपथांवर (footpath) झाडं (tree) आहेत. पदपथांचं काम करताना या झाडांना अनेकदा नुकसान पोचतं. पदपथांचं काँक्रिटीकरण करताना किंवा तेथे लादी टाकताना या झाडांभोवतीचा पूर्ण भाग व्यापला होता. अनेक पदपथांवर झाडाला पूर्ण खेटून लादी असते. त्यामुळे झाडाला पाणी देता येत नाही किंवा आजूबाजूला पाणी टाकले तरी ते झिरपत नाही. यामध्ये झाडे मरण्याची शक्यता अधिक असते.

पदपथांवरील या झाडांसाठी आता मुंबई महापालिकेच्या (mumbai municipal corporation) जीएस वाॅर्डने अनोखा उपाय अवलंबला आहे. या झाडांसाठी पोरस काँक्रिटची (Porous Concrete) नवीन संकल्पना कार्यान्वित केली जात आहे. यामध्ये झाडाच्या चारही बाजूला पाणी झिरपणारे पोरस काँक्रिट करण्यात येणार आहे. या काँक्रिटीकरणातून पाणी झिरपून ते झाडांच्या मुळापर्यंत जाईल. त्यामुळे पाण्याअभावी कुठलंही झाड मरणार नाही.  जीएस वाॅर्डने आपल्या विभागातील पदपथांवर पोरस काँक्रिटचा उपयोग केला आहे. 

  काही पदपथांवर झाडाच्या आजूबाजूला थोडी जागा मोकळी ठेवून बाजूने काम केले जाते. मात्र, यामुळे लादी उखडली जाऊन पदपथ खराब होतात. पोरस काँक्रिटमुळे लादी उखडण्याचा धोका राहणार नाही. तसंच पदपथाच्या सौंदर्यात बाधाही येणार नाही. हेही वाचा -

मालमत्ता कर थकवणाऱ्या ३,५६४ मालमत्तांवर पालिकेची कारवाई

करोनाची सेन्सेक्सला लागण, तब्बल २४०० अंकांनी आपटला
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा