Advertisement

कोरोनाची सेन्सेक्सला लागण, तब्बल २४०० अंकांनी आपटला

कोरोना विषाणूने जगातील अनेक देशांमध्ये हैदोस घातला असताना देशातील शेअर बाजारही (share market) या करोनाच्या विळख्यात आला आहे. सोमवारी सेन्सेक्स (sensex) तब्बल २४ हजार अंकाने कोसळला. तर निफ्टीने (nifty) तब्बल ६०० अंकांची मोठी घसरण नोंदवली आहे.

कोरोनाची सेन्सेक्सला लागण, तब्बल २४०० अंकांनी आपटला
SHARES

कोरोना विषाणूने जगातील अनेक देशांमध्ये हैदोस घातला असताना देशातील शेअर बाजारही (share market) या करोनाच्या विळख्यात आला आहे. सोमवारी सेन्सेक्स (sensex) तब्बल २४ हजार अंकाने कोसळला. तर निफ्टीने (nifty) तब्बल ६०० अंकांची मोठी घसरण नोंदवली आहे. शेअर बाजारातील मागील १५ वर्षातील ही सर्वात मोठी आपटी आहे. 

शेअर बाजारातील ह्या एेतिहासिक घसरणीतल गुंतवणूदारांना तब्बल ६ लाख कोटी रूपयांचा फटका बसला आहे. कोरोना व्हायरस आणि रशिया-सौदी अरेबियात भडकलेलं तेलयुद्ध यामुळे जगभरातील शेअर बाजार कोसळले आहेत. याचा परिणाम देशातील शेअर बाजारांवरही झाला. सोमवारी बाजार उघडताच सेन्सेक्स मोठ्या अंकाने घसरून उघडला. दुपारपर्यंत सेन्सेक्सची घसरण २४०० अंकांपर्यंत वाढून ३५ हजार ५०० वर आला. तर निफ्टीही दुपारपर्यंत ६०० अंकांनी कोसळला. 

सोमवारी कच्च्या तेलाचे भाव १९९१ नंतर प्रथमच सर्वात खालच्या पातळीवर गेले आहेत. याचं कारण म्हणजे सौदी अरेबिया आणि रशियामध्ये सुरू झालेले किंमत युद्ध. कोरोनाव्हायरसच्या प्रादुर्भावामुळे क्रूडची मागणी घटली आहे. त्याचा पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत हे देश मागणी वाढवण्यासाठी किंमती कमी करत आहेत. त्याचा विपरीत परिणाम शेअर बाजारावर झाला. गेल्या आठवड्यात जागतिक रेटिंग एजन्सी मूडीजने आपल्या अहवालात म्हटलं की कोरोनाव्हायरसमुळे यावर्षी जागतिक मंदी सुरू होऊ शकते. अमेरिका, जपान, जर्मनी, इटली, फ्रान्स, ब्रिटन आणि कोरिया या मंदीच्या भोवऱ्यात सापडतील. करोनाचा अमेरिकन अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होण्याची भीती अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली होती.




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा